जयंत पाटलांच्या भेटीमध्ये नेमकी काय झाली चर्चा? खुद्द बावनकुळेंनी केले स्पष्ट…

Chandrashekhar Bawankule On Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. या भेटीवरुन जयंत पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या भेटीबाबत आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच ही भेट राजकीय नव्हती असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
“जयंत पाटील हे सांगली जिल्हा आणि त्यांच्या जिल्ह्यातील महसुली खात्याशी संबंधित विषय घेऊन भेटायला आले होते. ही आमची कोणतीही राजकीय भेट नव्हती. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा उपस्थित होते. जयंत पाटील यांनी महसूल विभागाशी संबंधित सुमारे १४ ते १५ विषय आपल्यासमोर ठेवले. महसूल खात्याच्या विभागाने काही बैठका घ्याव्या लागतील, असे त्यांनी सर्व विषय माझ्यासमोर मांडले आहेत. त्यानुसार येणाऱ्या अधिवेशनात सांगलीची आणि त्यांनी मांडलेल्या १४ समस्यांची बैठक मी माझ्या दालनात घेईल, असे आश्वासन मी त्यांना दिले आहे, ” असं बावनकुळेंनी सांगितले. Chandrashekhar Bawankule On Jayant Patil |
पुढे ते म्हणाले, “फक्त विकासाच्या कामाबाबतीत आमची चर्चा झाली. त्यांचे काही मुद्दे महत्वाचे होते ते मी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच जयंत पाटील यांनीही माझ्याशी राजकीय चर्चा केली नाही आणि मी देखील त्यांच्या राजकीय भविष्याबाबत बोलण्याएवढा मोठा नाही”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.
तर जयंत पाटील यांनीही चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतच्या भेटीमध्ये सांगलीच्या काही महसूल प्रश्नावर जवळपास दहा ते बारा निवेदने दिली असल्याचे सांगितले होते. Chandrashekhar Bawankule On Jayant Patil |
…तर त्यात वावगं काय? – संजय राऊत
या भेटीवरून उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. “चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे महसूल मंत्री आहेत. तर जयंत पाटील हे एक जबाबदार नेते, एका प्रमुख पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी विधीमंडळात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारच्या एखाद्या मंत्र्याला कुणी भेटत असेल त्यात वावगं काय?”, असा सवालसंजय राऊत यांनी केला होता. Chandrashekhar Bawankule On Jayant Patil |
दरम्यान, राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर जयंत पाटील हे शरद पवार यांच्यासोबत राहिले. मात्र मागील काही दिवसांपासून जयंत पाटील हेही शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देतील अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र तेव्हा जयंत पाटील यांनी वेळोवेळी चर्चा फेटाळून लावल्या होत्या.
हेही वाचा:
‘लाडकी बहीण योजना लवकरच बंद होणार’, काँग्रेसच्या ‘या’ खासदाराचा मोठा दावा





