“मला डावलले काय अन्…” ; मंत्रीपद न मिळाल्याने अखेर छगन भुजबळांनी व्यक्त केली नाराजी

Chhagan Bhujbal | राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूरमधील राजभवनात पार पडला. यावेळी महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महायुतीचे काही आमदार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यात छगन भुजबळ यांच्या नावाचा देखील समावेश आहे.
राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. यावरून भुजबळ समर्थक आक्रमक झाले आहेत. याबद्दल रविवारी रात्रीपासूनच नाशिकपासून ते राज्यातील अनेक भागांमध्ये ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे आजपासून विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. Chhagan Bhujbal |
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी भुजबळांशी संवाद साधण्याचा पत्रकारांनी प्रयत्न केला. नागपूरमधील रेडिसन ब्लू हॉटेलमधून विधानसभेत जाण्यासाठी छगन भुजबळ बाहेर पडले असता पत्रकारांनी त्यांच्याभोवती गर्दी केली. Chhagan Bhujbal |
होय, मी नाराज – भुजबळ
यावेळेस त्यांना तुम्ही नाराज असल्याचं समजतंय असं म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलं. त्यानंतर पत्रकारांनी पुन्हा त्यांना प्रश्न विचारला असता त्यावर अखेर भुजबळांनी “होय मी नाराज आहे. मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय आणि फेकले काय? काय फरक पडतो. मंत्रिपद किती वेळा आले आणि किती वेळा गेले भुजबळ संपले कधी संपले नाही. पण मी नाराज आहे. ज्यांनी मला डावललं त्यांना कारण विचारा. ओबीसींच्या लढ्यामुळेच महायुतीला यश मिळालं’,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
याचबरोबर भुजबळांना पत्रकाराने, “वरिष्ठांशी बोलणं झालं का?” असा प्रश्न विचारला असता भुजबळ यांनी चिडून ‘कोण वरिष्ठ?’ असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला. त्यामुळे मंत्रीपद न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी जाहीररित्या नाराजी व्यक्त केली आहे. Chhagan Bhujbal |
अजित पवारांच्या निकटवर्तीयाने घेतली भुजबळांची भेट
दरम्यान, भुजबळ यांची नाराज दूर करण्यासाठी अजित पवार यांनी आपल्या विश्वासू व्यक्तीला त्यांच्याकडे पाठवले. अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रमोद हिंदुराव यांनी भुजबळांची भेट घेतली असून पक्षाच्यावतीने त्यांनी भुजबळांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा:
बहादुर शाहच्या वारसाची ‘ती’ याचिका फेटाळली ; याचिकेत केली होती ‘ही’ महत्वपूर्ण मागणी





