Rahuri Election 2026 : रवींद्र चव्हाण आणि विखे पाटलांच्या भेटीनंतर प्राजक्त तनपुरेंचे मोठे संकेत; राहुरी पोटनिवडणुकीबाबत काय निर्णय घेणार?
Rahuri Election 2026 : मला माझ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल - प्राजक्त तनपुरे

Rahuri Election 2026: बारामतीची पोटनिवडणुक बिनविरोध होण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. नुकतेच मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची भेट घेतली.
त्यानंतर पत्रकार परिषद घेत लक्ष्मण हाके यांनी बारामती पोटनिवडणूकीतून माघार घेत असल्याचे सांगितले. मात्र अद्यापही सुनेत्रा पवार यांच्याविरोधात कोंग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांचे आव्हान आहे.
बारामतीसोबतच राहुरी विधानसभेची देखील पोटनिवडणूक पार पडणार आहे. याठिकाणी भाजपने त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात माजी राज्यमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
त्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली.
प्राजक्त तनपुरेंची मुख्यमंत्री फडणवीसांशी फोनवरुन चर्चा Rahuri Election 2026
यावेळी रवींद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन दिली. त्यामुळे आता प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र याबाबत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले नाही.
कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल – तनपुरे Rahuri Election 2026
प्राजक्त तनपुरे म्हणाले की, “भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांनी मला विनंती केली आहे. विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे. याबाबत मला कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल. माझा उमेदवारी अर्ज भरुन तयार आहे.एवढे मोठे नेते मला भेटून गेले.”
“तसेच ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवू म्हणतो, तो मुद्दाच सोडवण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. त्यामुळे मला माझ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल,” अशी प्रतिक्रिया प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली.
महायुती सरकार तनपुरेंच्या मागण्यांबाबत सकारात्मक
प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनीहीप्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, प्राजक्त तनपुरे, देवेंद्र फडणवीस, मी आम्ही सगळ्यांनी विधानसभेत एकत्र काम केले आहे. ते गेल्या वेळी राज्यात मंत्री म्हणून कार्यरत होते. राहुरी मतदारसंघातील विकासाचे विषय आणि समस्या एकत्रितपणे सोडवता येऊ शकतात.
ते जो म्हणतील त्या सगळ्या विकास कामाचा विचार केला जाईल, महायुती सरकार त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक राहील. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली. ते आता त्याच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेतील, असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले.
हेही वाचा:






