Ravindra Chavan : भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी महत्वाचे विधान केले आहे. आपल्याला सावध राहायची गरज आहे, असे ते म्हणाले आहेत. त्यांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमकं काय म्हणाले रविंद्र चव्हाण? 2024 ला आपला फेक नरेटिव्हने घात केला. लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात महायुतीला कमी जागा मिळाल्या होत्या. आपल्याला सावध राहायची गरज आहे, असे विधान करत त्यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. सध्या कोणत्याही निवडणुका नाहीत. मात्र, तरीही 2029 ची तयारी आत्तापासूनच केली जात आहे, अशी चर्चा आहे. तसेच रविंद्र चव्हाण यांनी बोलताना कार्यकर्त्यांना महत्वाचे आवाहनही केले. ते म्हणाले, पुढील वर्षभरात प्रवास जास्तीत जास्त करावा बूथ लेवल वरती प्रवास करून कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी संपर्क अधिक बळकट करावा. पुढे बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले, विविध कार्यक्रमाच्या उपक्रमातून माध्यमातून आपल्याला संघटना अजून मजबूत कशी करता येऊ शकते कार्यकर्त्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देणे आणि कार्यकर्त्यांनी आपल्या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत आपला जो विषय आहे अंत्योदय तो विषय पोहोचवण्याचा काम करावं. भारतीय जनता पार्टीचा 6 एप्रिल या दिवशी वर्धापन दिन होता. या पार्श्वभूमीवर देशभरातील पक्ष कार्यालयांमध्ये वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविंद्र चव्हाण म्हणाले, आज वर्धापन दिन संपूर्ण देशभर साजरा केला जातो. 46 वर्ष सेवेची 46 वर्ष समर्पणाची अशा पद्धतीने संपूर्ण देशभरामध्ये असंख्य कार्यकर्त्यांच्या त्याग आणि समर्पणातून भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आज या ताकतीने संघटनात्मक दृष्ट्या काम करतोय. सरकार म्हणून केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये काम करताना आपल्याला दिसतोय, अशा शब्दांत रविंद्र चव्हाण यांनी कौतुकाचे उद्गार काढले. रविंद्र चव्हाणांचा महत्वाचा सल्ला सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रयत्न हे पसरवण्याचं काम केलं जातं, असे म्हणत आपण केलेले काम हे लोकांपर्यंत पोहोचवणं सामान्य जनतेपर्यंत पॉझिटिव्हली पोहोचवणं अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्म वरती आपण सर्वांनी सक्रिय राहिला पाहिजे, असा महत्वाचा सल्ला रविंद्र चव्हाण यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना दिला. हेही वाचा :Nandita Patkar : ‘एलिझाबेथ एकादशी’ फेम अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; साध्या पारंपरिक लुकने वेधलं सर्वांच लक्ष