Actor Mukesh Khanna : बोलता बोलता अभिनेते मुकेश खन्ना हे काय बोलून गेले; थेट बिग बींच्या दाढीवरच व्यक्त केला संशय

Actor Mukesh Khanna : अभिनेते मुकेश खन्ना हे नेहमी त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. तर त्यांनी केलेल्या काही विधानामुळे ते वाद ओढवून घेतात. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी ज्या महाभारत मालिकेत काम केलं होतं, त्याच मालिकेतील कलाकारांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं.
अशातच आता एका मुलाखतीत बोलताना मुकेश खन्ना यांनी थेट बॅालिवूड इंडस्ट्रीचे महानायक यांना ललकावणार विधान करत त्यांच्या दाढीवर संशय व्यक्त केला आहे. मुकेश यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत अभिनेते मुकेश खन्ना यांनी बिग बींच्या लूकवर कमेंट केली आहे. नुकतीच अभिनेत्याने फिल्मी ज्ञानला मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीतील हा व्हिडीओ सोशल मीडियावर धूमाकूळ घालत आहे. ‘मला आश्चर्य वाटतं की ते अमिताभ बच्चन या वयातही दाढी लावतात. ज्याची मी कल्पनाही करू शकत नाही, अशी टिप्पनी त्यांनी केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यांना इतक्या समस्या आहेत, तरीही ते त्याच्या कामासाठी इतके समर्पित आहे. याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो.
View this post on Instagram
एका युजरने म्हटले की, ‘मला त्याच्याबद्दल वाईट वाटते कारण त्याने त्याचे संपूर्ण आयुष्य लोकांचा हेवा करण्यात घालवले.’ दुसऱ्या एका युजरने कमेंट केली आहे, ‘सर, आश्चर्यचकित होऊ नका, बच्चन साहेब हे बच्चन साहेब आहेत.’ त्यांच्या या विधानामुळे नेटकरी अभिनेते मुकेश खन्ना यांना ट्रोल करत आहेत.
कोण आहेत मुकेश खन्ना?
अभिनेते मुकेश खन्ना यांनी बॅालिवूड सिनेमांमध्ये महत्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. मात्र, त्यांना सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली ती टेलिव्हिजनवरील शक्तीमान आणि महाभारतातील भीष्म या पात्रांमुळे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते सतत त्यांच्या विधानामुळे चर्चेत असतात. त्यांची काही विधाने वादग्रस्त असतात, ज्यामुळे त्यांच्यावर टीका केली जाते.
सध्या, अभिनेत्याच्या शक्तीमान सिनेमाची बरीच चर्चा सुरू आहे, मात्र, या सिनेमाची शुटिंग अद्यापर्यंत पूर्ण झालेली नाही. अशीही चर्चा आहे की शक्तीमान सिनेमात अभिनेता रणवीर सिंह शक्तीमानच्या भूमिकेत दिसणार. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.





