Prajakta mali : “मला तू कसाबच्या भूमिकेतच जास्त आवडलाय…”; ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची ‘ती’ पोस्ट चर्चेत !
आता ललित प्रभाकर एका अशा भूमिकेमुळे चर्चेत आला आहे, जी पाहून त्याची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री प्राजक्ता माळीही अक्षरशः आश्चर्यचकित झाली आहे.

Prajakta mali | Lalit Prabhakar : अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील आदित्य-मेघनाच्या भूमिकांनी या जोडीला घराघरात पोहोचवलं. त्यानंतर दोघांनी वेगवेगळ्या कलाकृतींमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली.
मात्र आता ललित प्रभाकर एका अशा भूमिकेमुळे चर्चेत आला आहे, जी पाहून त्याची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री प्राजक्ता माळीही अक्षरशः आश्चर्यचकित झाली आहे. ललित आगामी ‘प्रहार’ या सिनेमात 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची भूमिका साकारताना दिसणार आहे.
नुकताच सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, ललितचा लूक आणि त्याची भूमिका पाहून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ‘प्रहार’चा ट्रेलर पाहिल्यानंतर प्राजक्ता माळीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ट्रेलर शेअर करत ललितसाठी खास पोस्ट लिहिली.
ललितच्या अभिनयाचं कौतुक करताना तिने लिहिलं, ‘सुपर… मला तू आदित्यपेक्षा जास्त कसाबच्या भूमिकेतच का आवडलाय कळेना… असं वाटतंय हा ट्रेलर तुझ्यासाठीच बनला आहे.’
प्राजक्ताच्या या प्रतिक्रियेमुळे तिची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे ललित आणि प्राजक्ता यांची मैत्री आणि त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री यामुळे दोघांच्या चाहत्यांमध्येही या पोस्टची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
ललितमुळे प्राजक्ताला पाहता येणार नाही ‘प्रहार’चा फर्स्ट डे फर्स्ट शो!
मात्र प्राजक्ताच्या पोस्टमधील शेवटची ओळही विशेष लक्ष वेधून घेणारी आहे. ‘पण तुझ्यामुळेच मी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहू शकणार नाही,’ असंही तिने म्हटलं आहे. यामागचं कारण म्हणजे ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी लवकरच एका नव्या प्रोजेक्टसाठी पुन्हा एकत्र येणार आहेत.
दोघांच्या ‘शुभमंगलमय जोडी दंगलम’ या सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकामुळे प्राजक्ताला ‘प्रहार’चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहता येणार नसल्याचं तिच्या पोस्टवरून दिसत आहे.









