Rohit Sharma Retirement : हिटमॅनचा कसोटीला अलविदा! ‘या’ ३ कारणांमुळे अचानक घ्यावी लागली निवृत्ती?

१. खराब फॉर्मशी झुंज –
रोहित शर्मा गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंजत आहे आणि त्याला धावा करणे कठीण झाले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका ०-३ अशी गमावली होती. या मालिकेत त्याच्या बॅटमधून फक्त एकच अर्धशतक निघाले आणि उर्वरित वेळ तो किवी गोलंदाजांसमोर संघर्ष करताना दिसला.
MS Dhoni in 2020 🤝 Rohit Sharma in 2025
Both announced their retirements at 19:29 🇮🇳#RohitSharma | #TestCaptain | #Hitman pic.twitter.com/vLbK6gRjED
— Indian Cricket Team (@incricketteam) May 7, 2025
यानंतर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही जुन्या कहाणीची पुनरावृत्ती झाली आणि त्याच्या बॅटमधून २० पेक्षा जास्त धावांची एकही इनिंग आली नाही. या कारणास्तव, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या आणि पाचव्या कसोटी सामन्यातून स्वतःला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले. त्याच्या निवृत्तीचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचा खराब फॉर्म आहे.
हेही वाचा – Rohit Sharma Retirement : हिटमॅन कसोटी क्रिकेटमधून निवृत्त! कोण असणार भावी ‘टेस्ट कॅप्टन’?
२. वाढते वय –
Rohit Sharma’s transformation into a dominant Test opener from 2019 to 2024 has been nothing short of spectacular. 🌟
At 32, he redefined his career, proving that age is just a number when talent and determination collide. 🔥 #TestCricket | #RohitSharma pic.twitter.com/OC0CU9oMDA
— Indian Cricket Team (@incricketteam) May 7, 2025
कसोटी हा क्रिकेटचा सर्वात जुना फॉरमॅट आहे आणि इथे फलंदाजाच्या संयमाची खरी परीक्षा घेतली जाते. रोहित शर्मा सध्या ३८ वर्षांचा आहे. त्याच वेळी, कोणत्याही फलंदाजासाठी वयाच्या ३८ व्या वर्षी कसोटी क्रिकेट खेळणे सोपे नसते. कारण कसोटी क्रिकेट पाच दिवसांचे असते, त्यामुळे येथे टिकून राहण्यासाठी फिटनेसही महत्त्वाचा असतो.
हेही वाचा – मुशीर खान ठरला T20 Mumbai League चा सर्वात महागडा खेळाडू! आयुष म्हात्रेही बनला लखपती
३. फिटनेसचा अभाव –
रोहित शर्माची तंदुरुस्ती देखील एक मोठी समस्या आहे. इतर खेळाडूंपेक्षा तो थोडा फिट दिसत नसल्याने अनेक अनुभवी खेळाडूंनी त्याच्या तंदुरुस्तीवर यापूर्वीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत धावताना त्याने अनेक सोपे झेल सोडले होते. रोहितने कसोटीतून लवकर निवृत्ती घेण्याचे सर्वात मोठे कारण फिटनेस देखील असू शकतो.





