मुशीर खान ठरला T20 Mumbai League चा सर्वात महागडा खेळाडू! आयुष म्हात्रेही बनला लखपती

T20 Mumbai League Auction 2025 Updates : टी-२० मुंबई लीगला २६ मे पासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत खेळाडूंची लिलाव प्रक्रियाही सुरू झाली आहे. यापूर्वी, या लीगमध्ये सहभागी होणाऱ्या ८ संघांनी त्यांचे आयकॉन खेळाडू जाहीर केले होते. आता मुंबईसाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना लिलावात चांगले भाव मिळाले आहेत. ज्यामध्ये मुशीर खान, आयुष म्हात्रे, सुर्यांश शेडगे आणि अंगकृष्ण रघुवंशी यांचा समावेश आहे.
मुशीर खानला ठरला सर्वात महागडा खेळाडू –
मुंबईचा युवा खेळाडू मुशीर खानला आर्क्स अंधेरी संघाने १५ लाख रुपयांना खरेदी केले आहे. या लीगमधील लिलावात मुशीर खान हा सर्वाधिक रक्कम मिळवणारा खेळाडू ठरला आहे. मुशीर सध्या आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्ज संघाचा सदस्या आहे. पंजाबने मुशीरला बेस प्राईसवर आपल्या संघात सामील केले होते.
Musheer Khan and several other young, talented all-rounders received big bids in the T20 Mumbai League Auction 🔥💵🏏#T20MumbaiLeague #MusheerKhan #ShamsMulani #Sportskeeda pic.twitter.com/sNZF0D0lmA
— Sportskeeda (@Sportskeeda) May 7, 2025
आयुष म्हात्रेलाही लागली लॉटरी –
Ayush Mhatre & Angkrish Raghuvanshi fetch big bids in the T20 Mumbai League 💰🤩⚡
Ayush joins SKY’s Triumph Knights, while Angkrish teams up with Shreyas Iyer! 🤝#T20MumbaiLeague #AyushMhatre #AngkrishRaghuvanshi #Sportskeeda pic.twitter.com/SstZP8zkHy
— Sportskeeda (@Sportskeeda) May 7, 2025
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या आयुष म्हात्रेला १४.७५ लाख रुपयांना ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थईस्टच्या संघाने खरेदी केले आहे. आयुष म्हात्रेने या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत चेन्नईसाठी उत्तम कामगिरी केली आहे. तथापि, चेन्नई सुपर किंग्ज संघ हा आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमधून बाहेर पडला आहे.
हेही वाचा – Jemimah Rodrigues : जेमिमा रॉड्रिग्जने रचला इतिहास, भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारी ठरली तिसरी महिला खेळाडू
तसेच अंगकृष रघुवंशीला १४ लाख रुपयांमध्ये सोबो मुंबई फाल्कन्स संघाने खरेदी केले आहे, अंगकृष रघुवंशीने केकेआरसाठी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. तो अनेक सामन्यांमध्ये मॅचविनर ठरला आहे. यानंतर, शेजला ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थईस्टने १३.७५ लाख रुपयांना खरेदी केले. तर तनुष कोटियनला नॉर्थ मुंबई पँथर्सने १० लाख रुपयांना खरेदी केले.
हेही वाचा – MI vs GT : मुंबई इंडियन्सला पराभवानंतर मोठा दणका! हार्दिक पंड्यासह संपूर्ण संघाला ठोठावला दंड
संघ आणि त्यांचे आयकॉन खेळाडूंची यादी:
- पृथ्वी शॉ – नॉर्थ मुंबई पँथर्स (होरायझन स्पोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड)
- शिवम दुबे – एआरसीएस अंधेरी (आर्क्स स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड)
- सूर्यकुमार यादव – ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्ट (ट्रान्सकॉन ट्रायम्फ नाईट्स प्रायव्हेट लिमिटेड)
- अजिंक्य रहाणे – वांद्रे ब्लास्टर्स (पीके स्पोर्ट्स व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड)
- शार्दुल ठाकूर – ईगल ठाणे स्ट्रायकर्स (ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड)
- सर्फराज खान – आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स (वर्ल्ड स्टार प्रीमियर लीग एलएलपी)
- श्रेयस अय्यर – सोबो मुंबई फाल्कन्स (रोडवे सोल्युशन्स इंडिया इन्फ्रा लिमिटेड)
- तुषार देशपांडे – मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स (रॉयल एज स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट)





