Rohit Sharma Retirement : हिटमॅन कसोटी क्रिकेटमधून निवृत्त! कोण असणार भावी ‘टेस्ट कॅप्टन’?

#RohitSharma has announced his retirement from Test cricket! 🥺
End of an era! See you in the ODIs, Rohit 🙌 pic.twitter.com/rpuQsz1IeV
— Star Sports (@StarSportsIndia) May 7, 2025
रोहित शर्मा काही काळापासून करत होता संघर्ष –
मात्र, तो गेल्या काही काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये संघर्ष करत होता. बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतही त्याच्या बॅटमधून धावा आल्या नव्हत्या. यानंतर, डिसेंबर २०२४ आणि जानेवारी २०२५ मधील ऑस्ट्रेलिया दौरा त्याच्यासाठी कठिण होता. या संपूर्ण काळात, आठ कसोटी सामन्यांमध्ये रोहितची सरासरी १०.९३ होती आणि तो फक्त एकदाच ५० चा टप्पा ओलांडू शकला. भारताने बांगलादेशविरुद्धच्या दोन्ही कसोटी जिंकल्या, पण न्यूझीलंडने भारताला ३-० ने हरवले. भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ३-१ ने गमावली.
हेही वाचा – मुशीर खान ठरला T20 Mumbai League चा सर्वात महागडा खेळाडू! आयुष म्हात्रेही बनला लखपती
रोहित शर्माची कसोटी कारकीर्द –
Thank you, Captain 🫡🫡
End of an era in whites!@ImRo45 bids adieu to Test cricket. He will continue to lead India in ODIs.
We are proud of you, Hitman 🫡🫡 pic.twitter.com/azlpZFWdhn
— BCCI (@BCCI) May 7, 2025
रोहितने ६७ कसोटी सामन्यांमध्ये ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा केल्या, ज्यामध्ये १२ शतके आणि १८ अर्धशतके आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात रोहितने भारताचे नेतृत्व केले. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मैदानावरील शेवटची मालिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेचा अपवाद वगळता कर्णधार म्हणून त्याची कामगिरी प्रभावी राहिली आहे.
कोण असणार भावी कसोटी कर्णधार?
इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताला नवीन कसोटी कर्णधार मिळेल. त्याचे संभाव्य उमेदवार जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, शुबमन गिल आणि ऋषभ पंत असू शकतात. सध्या बुमराह कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहितच्या अनुपस्थितीत बुमराहने तिथे कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती.





