Iran sets three conditions : शांततेसाठी इराणच्या तीन अटी काय? पाकिस्तानच्या ‘या’ नेत्यांशी करणार चर्चा
इस्रायली अधिकाऱ्यांनी बंद दरवाजाआड मान्य केले आहे की, सध्याच्या बॉम्बस्फोटांमुळे इराणमधील धर्मगुरू सरकार कोसळण्याची शक्यता कमी आहे.

Iran sets three conditions : इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेला भीषण संघर्ष निर्णायक वळणावर पोहोचला आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी हा संघर्ष थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायासमोर तीन मुख्य अटी ठेवल्या आहेत. रशिया आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर पेझेश्कियान यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली.
इराणने कोणत्याही शांतता ठरावात इराणचे सार्वभौम आणि कायदेशीर हक्क मान्य केले जावेत, युद्धामुळे इराणच्या पायाभूत सुविधांचे जे नुकसान झाले आहे, त्याची पूर्ण भरपाई देण्यात यावी व भविष्यात इराणवर पुन्हा अशा प्रकारचे हल्ले होणार नाहीत, याची ठोस आंतरराष्ट्रीय हमी मिळावी या तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. Iran sets three conditions
एकीकडे अध्यक्ष शांततेची भाषा करत असताना, इराणच्या सशस्त्र दलांचे प्रवक्ते अबोलफझल शेखारची यांनी कडक इशारा दिला आहे. जर अमेरिकेने इराणच्या बंदरांना किंवा गोदींना लक्ष्य केले, तर पर्शियन आखातातील कोणतेही बंदर किंवा आर्थिक केंद्र इराणच्या क्षेपणास्त्रांच्या आवाक्याबाहेर राहणार नाही.Iran sets three conditions
आम्ही या प्रदेशातील देशांना आवाहन करतो की त्यांनी अमेरिकन सैन्याला त्यांच्या भूमीतून हाकलून लावावे, असे शेखारची यांनी सरकारी टीव्हीवर बोलताना सांगितले.
इराणसमोरील आव्हाने Iran sets three conditions
सध्या तेहरानसह अनेक शहरांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव होत आहे. जानेवारीत झालेल्या निदर्शनांमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाल्याने जनता रस्त्यावर उतरण्यास घाबरत असली, तरी कडक निर्बंधांमुळे इराणची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.
युद्ध लांबल्यास इराणसमोरील सामाजिक आणि आर्थिक संकटे अधिक गडद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इराण समोर सध्यातरी सामाजिक सलोखा व झालेली आर्थिक नाकेबंदी मोडून काढण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
इस्रायलचे अंतर्गत मूल्यांकन Iran sets three conditions
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या माहितीनुसार, इस्रायली अधिकाऱ्यांनी बंद दरवाजाआड मान्य केले आहे की, सध्याच्या बॉम्बस्फोटांमुळे इराणमधील धर्मगुरू सरकार कोसळण्याची शक्यता कमी आहे. तीव्र हल्ले होऊनही इराणी जनतेमध्ये उठावाचे कोणतेही ठोस चिन्ह दिसत नाही.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध लवकरच संपेल असे संकेत दिले असले तरी, इस्रायलच्या मते वॉशिंग्टन सध्या युद्ध थांबवण्याच्या मानसिकतेत नाही. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि अनेक कमांडर मारले गेले आहेत.
मात्र, या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्याने आणि सार्वजनिक इमारती उद्ध्वस्त झाल्याने इराणी जनतेमध्ये संतापाची लाट आहे.






