WI vs BAN : वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूवर सोपविली नेतृत्वाची जबाबदारी…

West Indies vs Bangladesh T20I Series : वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे, ज्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. बांगलादेश सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. 3 टी-20 सामन्यांची मालिका 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
यष्टिरक्षक फलंदाज लिटन दासकडे 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेची कमान सोपवण्यात आली आहे. संघाचा नियमित कर्णधार नजमुल हुसेन शांतो सध्या दुखापतीतून सावरत आहे. अशा परिस्थितीत संघाची कमान लिटन दासकडे सोपवण्यात आली आहे. तसेच लिटन याने याआधीही बांगलादेशचं नेतृत्व केलं आहे. लिटन दास याने 2021 च्या न्यूझीलंड दौऱ्यात महमुदुल्लाह याच्या अनुपस्थितीत नेतृत्व केलं होतं .
तसेच या मालिकेतून बांग्लादेश टीममध्ये 6 खेळाडूंचं कमबॅक झालं आहे. सौम्या सरकार,अफीफ हुसैन, शमीम हुसैन पटवारी, नसुम अहमद, हसन महमूद आणि रिपन मोंडोल यांचं कमबॅक झालं आहे.
असा आहे दौरा…
बांगलादेश क्रिकेट संघ 2 कसोटी, 3 वनडे आणि 3 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजने 201 धावांनी जिंकला, तर बांगलादेशने दुसरा सामना 101 धावांनी जिंकला आणि 2 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजने 5 गडी राखून जिंकला आहे. तर 3 सामन्यांची टी-20 मालिका 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल.
मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना – सोमवार 16 डिसेंबर
दुसरा सामना – बुधवार 18 डिसेंबर
तिसरा सामना – शुक्रवार 20 डिसेंबर
Test Cricket | भारत-द.आफ्रिका यांच्यात होऊ शकते WTC फायनल 2025, जाणून घ्या संपूर्ण समीकरण…
टी-20 मालिकेसाठी बांगलादेशचा संघ : लिटन कुमार दास (कर्णधार), सौम्या सरकार, तंजीद हसन तमीम, परवेज हुसैन एमोन, अफीफ हुसैन, मेहदी हसन मिराज, जेकर अली अनिक, शमीम हुसैन पटवारी, शेख महेदी हसन, रिशाद हुसैन, नसुम अहमद, तस्कीन अहमद, तंजीम हसन साकिब, हसन महमूद, रिपन मोंडोल.




