WI vs BAN 3rd ODI : बांगलादेशचा सुपडा साफ, तिसऱ्या सामन्यासह वेस्ट इंडिजने मालिकाही घातली खिशात…

West Indies vs Bangladesh 3rd ODI : आमिर जंगूच्या (Amir Jangoo) नाबाद 104 धावांच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा 4 गडी राखून पराभव केला. यासह वेस्ट इंडिजने तीन सामन्याची मालिका 3-0 ने खिशात टाकली आहे. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना सौम्या सरकार 73 धावा, मेहंदी हसन 77 धावा, महमुदुल्लाह नाबाद 84 आणि झाकीर अलीच्या नाबाद 62 धावांच्या जोरावर बांगलादेशने 50 षटकात 5 विकेट गमावत 321 धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने केवळ 45.5 षटकांतच 325 धावा करत लक्ष्य गाठले. या सामन्यात अमीर जंगूने सर्वाधिक 104 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने 83 चेंडूंच्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले तर वेस्ट इंडिजचा शेरफेन रदरफोर्ड मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.
West Indies vs Bangladesh | 3rd ODI
West Indies won by 4 wicketsPC: CWI#BCB | #Cricket | #BANvWI pic.twitter.com/urjEaXKDhW
— Bangladesh Cricket (@BCBtigers) December 12, 2024
बांगलादेशने दोन शतकी भागीदारीच्या जोरावर 50 षटकांत 5 गडी गमावून 321 धावा फलकावर लावल्या होत्या. आता 322 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाची सुरुवातही चांगली झाली नाही. अवघ्या 31 धावांत त्यांनी 3 गडी गमावले होते. त्यानंतर संघाला चौथा धक्का बसला तेव्हा स्कोअर बोर्डाने 80 चा टप्पा ओलांडला होता आणि संघ पराभवाच्या छायेत दिसत होता मात्र, त्यानंतर आधीच क्रीजवर असलेल्या केसी कार्टीला आमिर जंगूची उत्कृष्ट साथ मिळाली आणि सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटले.
आमिर जांगू आणि केसी कार्टीने मिळून पाचव्या विकेटसाठी 115 चेंडूत 132 धावा जोडल्या. केसी कार्टी 95 धावांवर बाद झाला आणि ही भागीदारी तुटली. कार्टी गेल्यानंतरही आमिर जंगूचा दृष्टिकोन बदलला नाही. नवोदित नसून एखादा अनुभवी खेळाडू खेळत असल्याप्रमाणे तो खेळला. येथून आमिर जंगूने गुडाकेश मोतीसोबत सहाव्या विकेटसाठी 53 चेंडूत नाबाद 91धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. यादरम्यान 27 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज आमिर जांगूने 83 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 104 तर गुडाकेश मोती यानं 31 चेंडूत नाबाद 44 धावांची खेळी केली. आपला पहिला सामना खेळताना, आमिर जंगूने केवळ शतकाची स्क्रिप्टच लिहिली नाही तर संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक :
बांग्लादेश : 321/5(50)
मेहदी हसन 77(73), सौम्या सरकार 73(73), महमुदुल्लाह 84*(63) आणि झाकीर अली 62*(57).
अल्जारी जोसफ 10-43-2, शरफ़ेन रदरफ़ोर्ड 6-37-1.
वेस्ट इंडीज : 324/6 (45.5)
अमीर जांगू 104*(83),केसी कार्टी 95(88)
रिशाद होसैन 9-68-2, तस्कीन अहमद 9-49-1.




