West Bengal Election : पश्चिम बंगालच्या निवडणूका 3 टप्प्यांत घ्या; भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी
भारतीय जनता पक्षाच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने सोमवारी भारतीय निवडणूक आयोगाच्या पूर्णपीठाची भेट घेऊन आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक (West Bengal Election) जास्तीत जास्त तीन टप्प्यांत घेण्याची आग्रही मागणी केली आहे.

West Bengal Election : भारतीय जनता पक्षाच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने सोमवारी भारतीय निवडणूक आयोगाच्या पूर्णपीठाची भेट घेऊन आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक (West Bengal Election) जास्तीत जास्त तीन टप्प्यांत घेण्याची आग्रही मागणी केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त एस.एस. संधू व विवेक जोशी सध्या बंगालच्या (West Bengal Election) दौऱ्यावर असून, त्यांनी आज विविध राजकीय पक्षांच्या सूचना ऐकून घेतल्या. भाजप नेते जगन्नाथ चट्टोपाध्याय आणि शिशिर बाजोरिया यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयोगाला १६ कलमी मागण्यांचे निवेदन सादर केले.
यामध्ये राज्यातील सुरक्षा व्यवस्थेबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. भाजपने म्हटले आहे की, निवडणूक प्रक्रिया विनाकारण सात किंवा आठ टप्प्यांत खेचण्याची गरज नाही, ती एक, दोन किंवा जास्तीत जास्त तीन टप्प्यांत पूर्ण करावी. राज्यात सध्या तैनात असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलांच्या ४०० कंपन्यांचा वापर राज्य पोलीस चुकीच्या पद्धतीने करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
केंद्रीय दलांचे रूट मार्च केवळ शांत भागात आणि मुख्य रस्त्यांवर काढले जात आहेत, तर संवेदनशील भागांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होण्याऐवजी भीती कायम आहे, असे शिशिर बाजोरिया यांनी नमूद केले.
संवेदनशील बुथसाठी अतिरिक्त सुरक्षा West Bengal Election

Bengal polls
भाजपने संवेदनशील मतदान केंद्रे ठरवण्यासाठी नवीन निकष सुचवले आहेत. ज्या मतदान केंद्रांवर मागील निवडणुकांमध्ये ८५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे किंवा जिथे हिंसाचाराचा इतिहास आहे, अशा बुथना आपोआप संवेदनशील घोषित करून तिथे अतिरिक्त सुरक्षा पुरवावी, अशी मागणी पक्षाने केली आहे. तसेच, मतदारांना मतदानापासून रोखणाऱ्या पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहनही आयोगाला करण्यात आले आहे.





