पश्चिम बंगाल मध्ये भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला
Updated On:

खेजुरी – भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांच्या पुर्व मेदिनीपुर येथील सभेसाठी निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांवर दुसऱ्या गटाच्या लोकांनी जोरदार हल्ला केल्याची घटना आज येथे घडली. आज दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमाराला हा प्रकार घडला.
क्रुड बॉम्ब आणि दगडांचा वापर करून हा हल्ला करण्यात आला. त्यात अनेक भाजप कार्यकर्ते जखमी झाले. हल्लेखोरांनी भाजप कार्यकर्त्यांच्या वाहनांचीही मोडतोड केली असा आरोप भाजप नेत्यांनी केला. हा हल्ला तृणमुल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच केला असा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणालाच अटक केली नाही. दरम्यान घटनास्थळी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून येथील स्थिती आता नियंत्रणात आहेत असे पोलिसांनी सांगितली.





