नवी दिल्ली – केंद्र सरकारने रिऍल्टी क्षेत्रासाठी पूरक वातावरण निर्मिती करणाऱ्या योजना अर्थसंकल्पात सादर केल्यामुळे या क्षेत्रातील विकसकांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. अर्थसंकल्पात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 80 लाख घराच्या उभारणीसाठी 48 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना घर घेण्यासाठी मद तव्हावी याकरीता सरकारने उपाययोजना जाहीर केल्या आहेत. सरकारने रिऍल्टी क्षेत्रासाठी काही सवलती जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात रिऍल्टी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात 6 टक्क्यापर्यंत वाढ झाली होती. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना नाईट फ्रांक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले की किफायतशीर घरांच्या योजनेसाठी सरकारने बरीच मदत जाहीर केली आहे. मात्र सर्वसाधारण क्षेत्रासाठी अपेक्षेपेक्षा कमी तरतुदी केल्या आहेत