PM Modi : ‘आम्ही नारी शक्तीला दिलेलं वचन पूर्ण करणारच’, डिलिमिटेशनवरून पंतप्रधान मोदींची पोस्ट
PM Modi : ३० नोव्हेंबर रोजी लोकसभा आणि २ डिसेंबरला राज्यसभेत महिला आरक्षणाच्या संदर्भातील लोकसभा मतदारसंघाच्या फेररचनेचं विधेयक पुन्हा मांडणार

PM Modi : पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या आधी डिलीमिटेशन विधेयकाच्या मुद्यांवरून एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. याद्वारे मोदींनी ‘आम्ही नारी शक्तीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत’, असे म्हणत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, महिला आरक्षणाच्या माध्यमातून संसद आणि विधानसभेत महिलांचा सहभाग वाढवण्याचे प्रयत्न अनेक दशकांपासून सुरू आहेत. ते स्वतः बऱ्याच काळापासून या दिशेने प्रयत्न करत आहेत आणि अनेक महिलांनी त्यांच्यासोबतच्या बैठकांमध्ये हा मुद्दा उपस्थित केला आहे.
त्याचबरोबर, अनेक महिलांनी महिला आरक्षणाबाबतच्या आपल्या चिंता आणि अपेक्षा व्यक्त करणारी पत्रे लिहिली आहेत. ते देशातील प्रत्येक महिलेला आश्वासन देतात की, महिला आरक्षण लागू करण्याच्या मार्गात येणारे सर्व अडथळे सरकार दूर करेल, असा निर्धारही मोदींनी व्यक्त केला असून विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
We had made a promise to our Nari Shakti and we remain committed to fulfilling it… https://t.co/ZT3TK71Psh
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2026
विरोधकांना प्रत्युत्तर
“आमचा संकल्प अढळ आहे, आमचा निश्चय पक्का आहे. जे पक्ष महिला आरक्षणाला विरोध करत आहेत, ते या देशातील महिलांना संसद आणि विधानसभांमधील त्यांचा सहभाग वाढवण्यापासून कधीही रोखू शकणार नाहीत. आता फक्त वेळेचा प्रश्न आहे,” असेही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. ३० नोव्हेंबर रोजी लोकसभा आणि २ डिसेंबरला राज्यसभेत महिला आरक्षणाच्या संदर्भातील लोकसभा मतदारसंघाच्या फेररचनेचं विधेयक पुन्हा मांडण्यात येणार आहे. या विधेयकाला पाठिंबा देण्यावरून सध्या दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Neena Gupta : नीना गुप्तांनी OTT आणि सिनेमातील फरकावर मांडले स्पष्ट मत; म्हणाल्या…





