WCL 2025 : डब्ल्यूसीएलच्या मालकाचं लाईव्ह शोमध्ये अँकरला प्रपोजल, VIDEO होतोय व्हायरल

WCL 2025 Harshit Tomar’s proposal to Karishma Kotak : इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (WCL) 2025 च्या दुसऱ्या हंगामाचा शेवट धमाकेदार पद्धतीने झाला. दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सने अंतिम सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्सला 9 गडी राखून पराभूत करत जेतेपद पटकावले. एबी डिव्हिलियर्सच्या नेतृत्वाखालील साऊथ आफ्रिकेच्या संघाने फायनलमध्ये जबरदस्त खेळ दाखवला, पण याच सामन्यापूर्वी डब्ल्यूसीएलचे मालक हर्षित तोमर यांनी लाइव्ह शोमध्ये केलेल्या प्रपोजलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
फायनलपूर्वी रंगली प्रपोजलची चर्चा –
शनिवार, 2 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या फायनल सामन्यापूर्वी एका शोदरम्यान प्रसिद्ध अँकर करिश्मा कोटक मैदानावर उपस्थित होती. ती डब्ल्यूसीएलचे मालक आणि सीईओ हर्षित तोमर यांच्याशी स्पर्धेबाबत चर्चा करत होती. शोच्या शेवटी करिश्माने तोमर यांना विचारले की, फायनलनंतर ते कसा आनंद साजरा करतील? यावर तोमर यांनी सर्वांना चकित करणारे उत्तर दिले.
WCL owner proposing Anchor on live after SA became champions 😭pic.twitter.com/o8fnjBGpb8
— Div🦁 (@div_yumm) August 2, 2025
हर्षित म्हणाले, “सर्व काही संपल्यानंतर मी कदाचित तुला प्रपोज करेन.” हे बोलताच तोमर हसत निघून गेले, तर करिश्मा अवाक होऊन फक्त “ओह माय गॉड” म्हणाली आणि हसू लागली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हर्षित तोमर आणि करिश्मा कोटक यांच्यात काही रिलेशन आहे की नाही, हे स्पष्ट नाही. मात्र, स्पर्धेनंतर तोमर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर करिश्मासोबतचा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी लाल रंगाचा हृदयाचा इमोजी कॅप्शन म्हणून वापरला.
हेही वाचा – IND vs ENG : रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्ध रचला इतिहास! ९३ वर्षांत असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
डिव्हिलियर्सचा फायनलमध्ये शतकी धमाका –
View this post on Instagram
फायनल सामन्याबद्दल बोलायचे तर, हा सामना पूर्णपणे एबी डिव्हिलियर्सच्या नावे राहिला. सात वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि चार वर्षांपूर्वी फ्रँचायझी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या डिव्हिलियर्सने या स्पर्धेत आधीच दोन शतके ठोकली होती. फायनलमध्येही त्याने 60 चेंडूंमध्ये 120 धावांची नाबाद तुफानी खेळी केली, ज्यामध्ये 7 षटकार आणि 12 चौकारांचा समावेश होता.
त्याच्या या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सने 197 धावांचे लक्ष्य फक्त 16.5 षटकांत 9 गडी राखून पूर्ण केले. तत्पूर्वी भारत-पाकिस्तान सामन्यांमुळेही ही स्पर्धा चर्चेत राहिली. तरीही, साऊथ आफ्रिकेच्या वर्चस्वाने आणि डिव्हिलियर्सच्या दमदार कामगिरीने फायनलची रंगत वाढवली. त्यानंतर हर्षित तोमर यांच्या प्रपोजलने तर या स्पर्धेला आणखी ग्लॅमरस बनवले.





