IND vs ENG : रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्ध रचला इतिहास! ९३ वर्षांत असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

जडेजाने इंग्लंडचा माजी कर्णधार ग्राहम गूचला मागे टाकत हा विक्रम नोंदवला. गूचने १९९० मध्ये भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत ५ अर्धशतके केली होती, तर जडेजाने या मालिकेतील पाच सामन्यांत ६ अर्धशतके ठोकली. गूचने १९९० मध्ये ७५२ धावा केल्या होत्या, तर जडेजाने या मालिकेत ५१६ धावा केल्या आहेत.
तीन भारतीयांनी गाठला ५०० धावांचा टप्पा –
Jaddu’s domination in England can never bore fans! ⚔️ #ENGvsIND #RavindraJadeja pic.twitter.com/9VOxJcX0CT
— OneCricket (@OneCricketApp) August 2, 2025
रवींद्र जडेजाने प्रथमच एका मालिकेत ५०० धावांचा टप्पा पार केला आहे. या मालिकेत भारतीय संघातील तीन फलंदाजांनी ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. कर्णधार शुबमन गिलने ७५४ धावांसह भारत-इंग्लंड मालिकेत एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला, तर सलामीवीर केएल राहुलने ५३२ धावा केल्या.
भारत-इंग्लंड मालिकेत सर्वाधिक अर्धशतके झळकावणारे खेळाडू :
- रवींद्र जडेजा (भारत) – ६ अर्धशतके – ५१६ धावा (२०२५)
- ग्राहम गूच (इंग्लंड) – ५ अर्धशतके – धावा ७५२ (१९९०)
- जो रूट (इंग्लंड) – ५ अर्धशतके – धावा ७३७ (२०२१-२२)
- यशस्वी जैस्वाल (भारत) – ५ अर्धशतके – धावा ७१२ (२०२४)
९३ वर्षांतील पहिलाच विक्रम –
Ravindra Jadeja departs, but not before completing his 27th Test half-century 👍 👍
Updates ▶️ https://t.co/Tc2xpWMCJ6#TeamIndia | #ENGvIND | @imjadeja pic.twitter.com/1MNEN1VQNv
— BCCI (@BCCI) August 2, 2025
भारताने आपला पहिला कसोटी सामना जून १९३२ मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स येथे खेळला होता, तर पहिली कसोटी मालिका १९३३-३४ मध्ये भारतात खेळली गेली होती. त्या मालिकेत लाला अमरनाथ यांनी २०३ धावा करत सर्वाधिक धावा केल्या होत्या. ९३ वर्षांच्या इतिहासात कोणत्याही फलंदाजाला एका मालिकेत ६ अर्धशतके झळकावता आली नव्हती.
हेही वाचा – IND vs ENG : जैस्वाल-आकाशच्या भागीदारीने रचला इतिहास! ठरली २१व्या शतकातील विक्रमी शतकीय भागीदारी
पाच अर्धशतके झळकावणारे तीन खेळाडू –
भारत-इंग्लंड मालिकेत पाच अर्धशतके करणारे तीन खेळाडू आहेत. इंग्लंडच्या ग्राहम गूच आणि जो रूट यांनी ही कामगिरी केली आहे, तर भारताकडून रवींद्र जडेजा आणि यशस्वी जैसवाल यांनी हा पराक्रम केला आहे. जैस्वालने मागील वर्षी घरच्या मैदानावर ५ अर्धशतके झळकावली होती.जडेजाच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याच्या या योगदानामुळे भारतीय संघ मालिकेत मजबूत स्थितीत आहे.





