वाझेंना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी; संशयास्पद इनोव्हाही जप्त

मुंबई -चकमकफेम सचीन वाझे यांना 25 मार्चपर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. दरम्यान, अंबानींच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांच्या स्कॉर्पिओपाठोपाठ आलेली संशयास्पद इनोव्हा तपास यंत्रणेने जप्त केली.
कोठडीतील तपास आवश्यक असल्याचे नमूद करत ठाणे न्यायलयाने वाझे यांना अटकपूर्व जामीन नाकारला होता. सचिन वाझे यांची 11 तास चौकशी केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्यांना शनिवारी रात्री अटक केली होती.
दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय युध्दही रंगले आहे. वाझेच्या अटकेने त्याचे वकील असल्यासारखे त्याला पाठीशी घालणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याभोवती प्रश्न निर्माण केले आहेत. मला वाटत होते यात एकच दिशा असावी मात्र, मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे प्रकरन अद्याप सुटले नाही. चौकशीत यात कोण सहभागी होते आणि त्यांचा हेतू काय होता हे स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, वाझे यांच्या अटकेने पोलिस दलाचे मानसिक खच्चीकरण होईल. सचिन वाझे हे अत्यंत प्रामाणिक आणि सक्षम अधिकारी आहेत. त्यांना जीलेटिनच्या कांड्या सापडल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली. त्याच प्रकरणात एक संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास करणे ही मुंबई पोलिसांची जबाबदारी होती. त्यात केंद्रीय संस्थांची गरज नव्हती.
दरम्यान, अंबानींच्या निवासस्थानाबहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवणाऱ्या स्कॉर्पिओ पाठोपाठ आलेली पांढरी इनोव्हा मोटार शनिावारी एनआयएने जप्त केली. ही मोटार मुंबई पोलिस दलातील अधिकाऱ्याची असल्याचे बोलले जाते. स्कॉर्पिओ पाठोपाठ आलेल्या इनोव्हा मोटारीचा तपास 25 फेब्रुवारीपासूनचे सीसीटीव्ही फुटेज पाहून करण्यात आला. ती मध्यरात्री एक वाजून 20 मिनिटांनी मुलूंड टोल नाक्यावर दिसली. ती कार्मीचील रस्त्यावर रात्री दोन वाजून अठरा मिनिटांनी दिसली. पहाटे तीन वाजून पाच मिनिटांनी मुलूंड टोल नाक्यावरून ती परत ठाण्याकडे गेली.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मोटार आरटीओच्या ताडदेव कार्यालात नोंदवली असून तिचा क्रमांक एमएच 01 झेडए 403 आहे. त्याच्या मागच्या बाजूच्या काचेवर पोलिस लिहलेले आहे. पेडर रोडवरील एनआयएच्या कार्यालयात टोईंग व्हॅनच्या सहाय्याने ती आणण्यात आली, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.





