“होय, मी पाकचा एजंट…” ! तहव्वुर राणाचा कबुलनामा ; पाक, आयएसआय अन् लष्कर बद्दल केले अनेक खुलासे

Tahawwur Rana’s confession। २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वुर हुसेन राणा याने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या चौकशीदरम्यान अनेक मोठे खुलासे केले आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत असलेल्या चौकशीदरम्यान राणाने काबुलनाम दिला आहे. राणाने “तो पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट होता, ज्याला खिलाफ युद्धादरम्यान सौदी अरेबियालाही पाठवण्यात आले होते” असा कबुली जबाब दिला आहे.
चौकशीदरम्यान, राणाने “लष्कर-ए-तोयबा ही केवळ एक दहशतवादी संघटना नाही तर ती हेरगिरी नेटवर्क म्हणून काम करते” अशी महत्वाची माहिती दिली. तसेच पुढे त्याने,”त्याचा मित्र आणि सहकारी डेव्हिड हेडलीने अनेक वेळा लष्करासाठी प्रशिक्षण घेतले होते” असाही काबुलनाम त्याने दिला आहे.
आयएसआयने मदत केली होती Tahawwur Rana’s confession।
राणाने पोलिसांना माहिती देताना,”मुंबईत त्याच्या इमिग्रेशन फर्मचे केंद्र उघडण्याचा त्याचा विचार होता आणि त्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांना व्यावसायिक खर्च म्हणून वर्णन केले होते.” असे सांगितले. परंतु त्याने हे देखील कबूल केले की २००८ मध्ये २६/११ चा हल्ला झाला तेव्हा तो मुंबईत उपस्थित होता आणि तो पूर्णपणे दहशतवादी कटाचा भाग होता.” असा मोठा कबुली जबाबाच राणाने दिला आहे.
त्याने कबूल केले की,”त्याने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससारख्या ठिकाणांची रेकी केली होती. चौकशीदरम्यान राणाने कबूल केले की हा हल्ला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या आयएसआयच्या सहकार्याने करण्यात आला होता. आता मुंबई पोलिस राणाला अटक करून त्याला ताब्यात घेण्याची तयारी करत आहेत, जेणेकरून तपास अधिक पुढे नेता येईल.
राणा हेडलीचा मित्र होता Tahawwur Rana’s confession।
तहव्वुर राणा हा २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवादी डेव्हिड हेडलीचा जवळचा मित्र होता. हेडलीच्या चौकशीत राणाचा उल्लेख करण्यात आला. या हल्ल्यात १० पाकिस्तानी दहशतवादी अरबी समुद्रमार्गे मुंबईत पोहोचले आणि त्यांनी रेल्वे स्टेशन, दोन आलिशान हॉटेल्स आणि एका ज्यू केंद्रावर हल्ला केला. सुमारे ६० तास चाललेल्या या हल्ल्यात १६६ लोक मारले गेले. राणावर हेडली, लष्कर-ए-तैयबा, हरकत-उल-जिहादी इस्लामी आणि पाकिस्तानसोबत कट रचल्याचा आरोप आहे.





