Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे उघडून ५,०७९ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडणार
Koyna Dam : नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

कोयनानगर – कोयना धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आज सायंकाळी पाच वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटांचे उघडून ५,०७९ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज दि. ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फुटाने उघडून ५,०७९ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. (Koyna Dam)
कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे १०५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना नदीमध्ये एकूण ६,१२९ क्युसेक विसर्ग सुरू होईल.

Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे उघडून ५,०७९ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडणार
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येणार्या येव्यानुसार सांडव्यावरून विसर्ग वाढवला जाऊ शकतो. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये.
नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद व उचित खबरदारी घ्यावी, असे आवाहन कोयना सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.
हेही वाचा:





