Karishma Tanna Blessed With Baby Boy: गुरुपौर्णिमेला करिश्मा तन्नाच्या घरी आनंदाची चाहूल; गोंडस मुलाला दिला जन्म
Karishma Tanna Blessed With Baby Boy करिश्मा आणि वरुण यांच्या घरी पहिल्यांदाच बाळाचं आगमन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.

Karishma Tanna Blessed With Baby Boy: बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा तन्ना आणि तिचे पती वरुण बंगेरा यांच्या आयुष्यात आनंदाची मोठी बातमी आली आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर, 29 जुलै 2026 रोजी करिश्माने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही आनंदाची माहिती स्वतः करिश्मा आणि वरुण यांनी सोशल मीडियावरील संयुक्त पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली. (Karishma Tanna Blessed With Baby Boy)
कपलने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “आमच्या मुलाचं आगमन झालं आहे. गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद आमच्याकडे आला आहे. 29 जुलै 2026… आमच्या छोट्या पाहुण्याचं या जगात मनापासून स्वागत.” या पोस्टनंतर सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. (Karishma Tanna Blessed With Baby Boy)
करिश्मा आणि वरुण यांच्या घरी पहिल्यांदाच बाळाचं आगमन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. चाहत्यांनी तसेच अनेक सेलिब्रिटींनी या दाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेता विक्रांत मॅसीने “खूप खूप शुभेच्छा, देवाची कृपा कायम राहो,” अशा शब्दांत अभिनंदन केले. तर स्मृती इराणी यांनी “मनःपूर्वक शुभेच्छा” देत आनंद व्यक्त केला. (Karishma Tanna Blessed With Baby Boy)
View this post on Instagram
याशिवाय कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा, अभिनेत्री दिया मिर्झा, मलायका अरोरा, वामिका गब्बी, अभिनेता सोनू सूद, कॉमेडियन भारती सिंह, महीप कपूर यांच्यासह अनेक प्रसिद्ध कलाकारांनी सोशल मीडियावर शुभेच्छा देत नवजात बाळाला आशीर्वाद दिले. (Karishma Tanna Blessed With Baby Boy)
गेल्या काही महिन्यांपासून करिश्मा तिच्या प्रेग्नन्सीमुळे चर्चेत होती. तिने वेळोवेळी बेबी बंप फ्लॉन्ट करत मॅटरनिटी फोटोशूटचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. विशेष म्हणजे गर्भावस्थेतही तिने नियमित व्यायाम सुरू ठेवला होता. निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या तिच्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. तसेच काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान तिने पापाराझींना धूम्रपान करू नये, अशी नम्र विनंती केली होती. तिच्या या कृतीचंही अनेकांनी कौतुक केलं होतं. (Karishma Tanna Blessed With Baby Boy)
Karishma Tanna
करिश्मा तन्ना आणि उद्योगपती वरुण बंगेरा यांनी 2022 मध्ये विवाह केला होता. त्यांच्या लग्नाला जवळपास चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता त्यांनी त्यांच्या पहिल्या अपत्याचं स्वागत केलं आहे. करिश्मा अभिनय क्षेत्रात सक्रिय असून अनेक मालिका, रिअॅलिटी शो आणि चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तर वरुण बंगेरा हे उद्योगक्षेत्राशी संबंधित आहेत आणि प्रसिद्धीपासून तुलनेने दूर राहतात. (Karishma Tanna Blessed With Baby Boy)
गुरुपौर्णिमेसारख्या पवित्र दिवशी मुलाचा जन्म झाल्यामुळे हा दिवस या दाम्पत्यासाठी आणखी खास ठरला आहे. चाहत्यांसह संपूर्ण मनोरंजन विश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, करिश्मा आणि वरुण यांच्या नव्या आयुष्यासाठी सर्वजण शुभेच्छा व्यक्त करत आहेत. (Karishma Tanna Blessed With Baby Boy)





