नगर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत
Updated On:

नगर – शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी दि. 28 रोजी फुटल्याने दोन दिवस निर्जळी होती. आज तिसऱ्या दिवशीही पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. सोमवारी दुपारी पाणी योजनेची मुख्य जलवाहिनी नांदगाव शिवारात फुटली. पाण्याच्या व हवेच्या दाबाने तडा जाऊन ही जलवाहिनी फुटली.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले होते.महापालिकेच्या वतीने जलवाहिनी दुरस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले. मात्र,सलग तीन दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सोमवारी व मंगळवारी पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. तर बुधवारी विस्कळीत व कमी दाबाने स्वरुपात पाणीपुरवठा झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.





