Nagar | मुळा धरणातून वांबोरी चारीला सोडले पाणी

राहुरी, (प्रतिनिधी): पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून वांबोरी चारीचे बहुतांश अडथळे दूर करण्यात आले आहेत.
टेलपर्यंत वांबोरी चारीचे पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केले.
मुळा धरण येथे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्याहस्ते वांबोरी पाईप चारीचे बटन दाबून पाणी सोडण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुरेशराव बानकर, माजी सभापती काशिनाथ लवांडे, सुरसिंग पवार, पुरुषोत्तम आठरे, एकनाथ पाटकर, वैभव खलाटे, अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, सर्जेराव घाडगे, अमित आव्हाड, उद्धव गिते, मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील आदी उपस्थित होते.
कर्डिले म्हणाले की, वांबोरी चारीची पंप दुरुस्ती झाली असून, तिसरा पंप देखील दुरुस्त झाल्याने यावेळी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पाणी मिळेल. यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी ही योजना सुरळीत होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
सध्या निवडणुकीचा काळ असून विरोधक वांबोरी चारीबाबत आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. मात्र, लाभधारक शेतकऱ्यांना योजनेसाठी कोणाचे सहकार्य आहे याची माहिती आहे .
माजी सभापती काशिनाथ लवांडे म्हणाले की, वांबोरी चारीच्या माध्यमातून काही गावांना लाभ मिळत नाही. त्यामुळे नेते व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून पूर्ण भागाला पाणी मिळेल याची दक्षता घ्यावी.
भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश बानकर यांनी सांगितले की, वांबोरी चारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले सातत्याने पाठपुरावा करत असतात. त्यामुळे आज पाणी सोडले जात आहे, याचे श्रेय पूर्णतः पालकमंत्री यांचेच आहे.
यावेळी कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी वांबोरी चारीच्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. उपस्थित नेत्यांचा सत्कार केला. याप्रसंगी प्रभाकर हरिश्चंद्रे , रामदास माने ,शिवाजी साठे, समीर पठाण,
उमेश शेळके, मयूर गवळी, सुजय काळे, महादेव गिते, सचिन शिंदे, भानुदास डमाळे, नंदू लोखंडे, विजय बलमे, भाऊसाहेब नवले, अशोक उंडे, संदीप गिते, बाबुराव निमसे आदींसह लाभधारक शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





