निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Nilvande Dam | निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्यातही वाढ झाली आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रणासाठी नदी पात्रात विसर्ग सुरू आहे.
आज दि. ७ जुलै रोजी निळवंडे धरणातून सकळी 09.00 वाजता 6570 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत दिवसभरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विसर्गात आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे.
यापार्श्वभूमीवर प्रवरा नदीकाठच्या अकोले, संगमनेर व ओझर बंधाऱ्याखालील, राहाता, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा या तालुक्यातील नदीकाठच्या सर्व गावांना/वस्त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नदीपात्रात काही साहित्य अथवा जनावर असल्यास तात्काळ हलविण्यात यावी. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा:
कोर्लई समुद्रात दिसलेली बोट पाकिस्तानी असल्याचा संशय; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर





