IPL 2024 : राजस्थान रॉयल्स नाही… यावेळी ‘हा’ संघ जिंकणार ट्रॉफी, पाकच्या माजी क्रिकेटरनं केला मोठा दावा…

Wasim Akram IPL 2024 Winner Prediction : आयपीएल 2024 चा निम्मा हंगाम संपला आहे. या मोसमातील आतापर्यंत 40 सामने खेळले गेले आहेत. IPL 2024 मध्ये कोणते 4 संघ पात्र ठरणार आहेत हे देखील हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघ पहिल्या स्थानावर आहे. पण तरीही माजी क्रिकेटपटूने केलेल्या दाव्याने करोडो चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. या माजी दिग्गज क्रिकेटपटूने आपल्या विधानाद्वारे स्पष्टपणे सूचित केले आहे की राजस्थान पॉइंट टेबलमध्ये अव्वल असले तरी ते ट्रॉफी जिंकू शकणार नाही.
माजी पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमने एका मीडिया चॅनलशी बोलताना सांगितले की, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतात, असे मी आधीच सांगितले होते. आता लखनौ सुपरजायंट्सही शर्यतीत कायम आहे. येथून कोणता संघ फायनल जिंकतो, हे त्याच्या कामगिरीवर अवलंबून असेल. आता जे योग्य वेळी योग्य कामगिरी करतील तेच पुढे जातील. आता हीच वेळ आहे की तुम्ही तुमच्या प्लेइंग इलेव्हनचा चांगला वापर करा, तुमच्या संघाचे संयोजन योग्य आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे खेळाडू जखमी होणार नाहीत.”
वसीम अक्रम पुढे म्हणाला की, मी कोलकाता नाईट रायडर्ससाठी काम केले आहे, मला गिरगिटसारखे रंग बदलायचे नाहीत. कोलकाता हा माझा आवडता संघ आहे आणि मला त्यांनाच जिंकताना पहायचे आहे. तो पुढे म्हणाला की, गौतम गंभीर केकेआरमध्ये परतल्यानंतर हा संघ अधिक मजबूत झाला आहे. अशा परिस्थितीत मला केकेआरला पुन्हा विजयी होताना पाहायचे आहे.
#WasimAkram tells some heartwarming moments during his time in #KolkataKnightRiders He also said ” @KKRiders is my team & I will always support #KKR“. @wasimakramlive 💜 pic.twitter.com/eTIK5ZXmCI
— SHAH RUKH KHAN FANS ASSOCIATION (@Srk_bangalore) April 25, 2024
अक्रम थेट पुढे म्हणाला की, “त्याला या हंगामात केकेआरला आयपीएलचा विजेता झालेले पहायचे आहे. अक्रम म्हणाला, “नक्कीच मला या हंगामात केकेआरने आयपीएलचे विजेतेपद मिळवावेसे वाटेल, मी केकेआरला जिंकण्याचा दावेदार मानत आहे. माझाही त्याला पाठिंबा आहे, गौतमच्या आगमनाने भारतीय खेळाडूंना मोठा पाठिंबा मिळाला आहे. केकेआरचे नशीब बदलत आहे. त्याला खूप आत्मविश्वास आहे. आणि त्याच्या उपस्थितीमुळे खेळाडूंना पूर्ण पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे केकेआर या मोसमात वेगळा संघ दिसतो.”
तो पुढे म्हणाला की, “KKR नंतर मला चेन्नई सुपर किंग्जचा संघ खूप आवडतो. सीएसके अखेरीस नक्कीच पुनरागमन करेल. नवा कर्णधार म्हणून रुतुराज गायकवाड यांच्याकडे कमान सोपवून फ्रँचायझीने भविष्यासाठी तयारी केली आहे. गायकवाड युवा खेळाडू आहे आणि धोनीसोबत एकत्र खेळत आहे. धोनीकडून त्याला कर्णधारपदाबद्दल खूप काही शिकायला मिळणार आहे. गेल्या वर्षी मी CSK बद्दल भाकित केले होते. माझा अंदाज बरोबर राहिला. KKR नंतर CSK हा माझा दुसरा आवडता संघ आहे.”





