Mitchell Starc Record : मिचेल स्टार्कचा वर्ल्ड रेकॉर्ड! वसीम अक्रमला मागे टाकत रचला नवा इतिहास

Mitchell Starc Broke Wasim Akram Records : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेतील दुसरी कसोटी थरारक वळणावर पोहोचली आहे. ब्रिस्बेनमध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडची सुरुवात संथ झाली, परंतु पहिल्या दिवसाअखेरीस त्यांनी ४ बाद १९३ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने उत्कृष्ट गोलंदाजी करत नवा इतिहास रचला.
स्टार्कने मोडला वसीम अक्रमचा मोठा रेकॉर्ड!
दुसऱ्या कसोटीदरम्यान मिचेल स्टार्कने एक मोठा टप्पा गाठला. सामन्यात ३ विकेट्स मिळवताच तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा डावखुरा वेगवान गोलंदाज बनला आहे. त्याने पाकिस्तानचे महान गोलंदाज वसीम अक्रम यांचा ४१४ विकेट्सचा विश्वविक्रम मोडला आहे. आता स्टार्क ४१५ विकेट्ससह या श्रेणीत जगातील अव्वल गोलंदाज बनला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे डावखुरे वेगवान गोलंदाज:
| गोलंदाजाचे नाव | विकेट्सची संख्या |
| मिचेल स्टार्क | ४१५+ |
| वसीम अक्रम | ४१४ |
| चमिंडा वास | ३५५ |
| ट्रेंट बोल्ट | ३१७ |
| मिचेल जॉनसन | ३१३ |
इंग्लंडला सुरुवातीलाच दिले झटके –
Mitchell Starc goes past Wasim Akram to become the most prolific left-arm quick in Test history 👏
📸: Jio Hotstar#Ashes #MitchellStarc pic.twitter.com/khqDoIN8OF
— CricTracker (@Cricketracker) December 4, 2025
मिचेल स्टार्कने इंग्लंडच्या डावाला सुरुवातीलाच हादरे दिले. त्याने सलामीवीर बेन डकेटला खाते उघडण्यापूर्वीच पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर त्याने ओली पोपलाही शून्य धावांवर बाद केले. या दोन सुरुवातीच्या विकेट्समुळे इंग्लंडवर दबाव आला. तिसरी विकेट्स त्याने हॅरी ब्रूकची घेतली, जो स्टार्कच्या चेंडूवर स्लिपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे झेल देऊन बाद झाला.
हेही वाचा – IND vs SA : द. आफ्रिकेने भारताला चारली धूळ! मार्करमच्या वादळी खेळीने विराट-ऋतुराजच्या शतकावर फेरलं पाणी
रूट आणि स्टोक्सची झुंज –
एका बाजूला स्टार्क प्रभावी ठरत असताना, इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने (७६ धावा) आणि जो रूटने (६८ धावा) संघाचा डाव सावरला. दिवसअखेर जो रूट क्रीझवर टिकून आहे आणि कर्णधार बेन स्टोक्स त्याला साथ देत आहे. या दोघांच्या भागीदारीवरच इंग्लंडची मोठी धावसंख्या अवलंबून आहे.





