भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli ) सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. क्रिकेट विश्वात विराटला फॉलो करणारा मोठा वर्ग आहे. अनेकांना त्याच्यासारखी दाडी ठेवण्याचं वेड लागलाय. टी-२० विश्वचषकात विराट जबरदस्त फॉर्ममध्ये होता. दरम्यान, विराट कोहली आणि पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मुंबईतील जुहू येथे एक अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. या अपार्टमेंटचे महिन्याचे भाडे तब्बल २.७६ लाख रुपये एव्हढे आहे.
“आशिष नेहरा टीम इंडियाचा चांगला प्रशिक्षक होऊ शकतो”, हरभजन सिंगचं भाष्य!
समोर आलेल्या माहितीनुसार, १,६५० स्क्वेअर फूट क्षेत्रफळ असलेले हे अपार्टमेंट हाय टाइड इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आहे. यात दोन अंडरग्राऊंड पार्किंगची जागा असून या ठिकाणी समुद्राचे मनमोहक दृश्य दिसते. हे अपार्टमेंट बडोद्याच्या राजघराण्याचे वंशज आणि क्रिकेट प्रशासक समरजितसिंह गायकवाड यांच्या मालकीचे आहे.
विराट कोहलीला ( Virat Kohli ) मैदानावरील क्रिकेटसोबतच मैदानाबाहेरील जाहिरातींमधून भरपूर पैसा मिळतो. तसंच त्याची पत्नी अनुष्का शर्मा ही बॉलीवूड अभिनेत्री असण्यासोबतच आता ती चित्रपट निर्माती म्हणूनही काम करते आहे. दोघांनी मिळून मुंबईत एक अपार्टमेंट भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीने १,६५० स्क्वेअर फूट अपार्टमेंटसाठी ७.५० लाख रुपये डिपॉझिट भरले आहे.
“आशिष नेहरा टीम इंडियाचा चांगला प्रशिक्षक होऊ शकतो”, हरभजन सिंगचं भाष्य!
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर विराट आणि अनुष्काने एक फार्महाऊसही विकत घेतला होता. अनुष्का आणि विराटने सप्टेंबर महिन्यात अलिबागमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली होती. त्यांनी झिराड गावाजवळ ८ एकर जमिनीसाठी सुमारे १९.२४ कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच १.१५ कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा केले.
विराट कोहली नुकताच टी-२० विश्वचषक खेळून परतला आहे. टी-२० विश्वचषकानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर असून ३ टी-२० सामान्यांच्या मालिकेत भारताने बाजी मारली. तर ३ वनडे सामान्यांची मालिका उद्यापासून सुरु होणार आहे. मात्र या मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. पुढील महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर विराट कोहली टीम इंडियासोबत दिसणार आहे.