Washington Sundar : भारताला तिसरा धक्का! वॉशिंग्टन सुंदर मालिकेतून बाहेर; विराटच्या खास शिलेदाराला मिळाली संधी

Washington Sundar Injury Ayush Badoni Replacement : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या विजयाचा आनंद साजरा करत असलेल्या भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. वडोदरा येथील पहिल्या वनडे सामन्यात गोलंदाजी करताना सुंदरला बरगड्यांना दुखापत (Side Strain) झाली होती. बीसीसीआयने त्याच्या जागी युवा फलंदाज आयुष बडोनी याचा संघात समावेश केला आहे.
सुंदरला मैदानाबाहेर जावे लागले –
पहिल्या वनडेत ५ षटके गोलंदाजी केल्यानंतर (२७ धावा) सुंदरला वेदना जाणवू लागल्याने त्याने मैदान सोडले होते. क्षेत्ररक्षणासाठी तो मैदानात परतला नाही, मात्र फलंदाजीसाठी तो आठव्या क्रमांकावर उतरला होता. सामन्यांनंतर झालेल्या स्कॅनमध्ये त्याची दुखापत गंभीर असल्याचे समोर आले, ज्यामुळे तो आता उर्वरित दोन सामन्यांना मुकणार आहे.
आयुष बडोनीची टीम इंडियात एन्ट्री –
🚨 News 🚨
Washington Sundar ruled out of #INDvNZ ODI series; Ayush Badoni receives maiden call-up.
Details ▶️ https://t.co/ktIeMig1sr #TeamIndia | @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 12, 2026
वॉशिंग्टन सुंदरच्या जागी संघात स्थान मिळालेला आयुष बडोनी राजकोटमध्ये संघात सामील होईल. बडोनीची देशांतर्गत क्रिकेटमधील आकडेवारी प्रभावी आहे.
- प्रथम श्रेणी क्रिकेट: २१ सामन्यांत १६८१ धावा (४ शतके, ७ अर्धशतके).
- लिस्ट-ए क्रिकेट: ६९३ धावा (१ शतक, ५ अर्धशतके).
दुखापतींचे सत्र सुरूच –
या मालिकेत दुखापतग्रस्त होणारा सुंदर हा तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी ऋषभ पंत (Side Strain) मालिकेतून बाहेर झाला होता, तर तिलक वर्मा शस्त्रक्रियेमुळे टी-२० मालिकेतून बाहेर आहे.
भारतीय संघ (अपडेटेड):
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयसवाल, ध्रुव जुरेल, आयुष बडोनी.





