‘रेड पडली का?’ तब्बल 25 आयपीएस अधिकाऱ्यांची टीम पोहचली आमिर खानच्या घरी

Aamir Khan | बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या मुंबईतील वांद्रे येथील घराबाहेरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलिसांच्या गाड्या त्याच्या घरातून बाहेर पडताना दिसत आहेत. सुमारे 25 आयपीएस अधिकारी त्याच्या घरी पोहोचले होते, असे सांगितले जात आहे. मात्र नेमकं काय घडलं आणि आयपीएस अधिकाऱ्यांची टीम आमिरच्या घरी का आली होती? असे सवाल आता उपस्थित केले जात आहे.
रिपोर्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार, 25 आयपीएस अधिकारी आमिर खानला भेटण्यासाठी त्याच्या वांद्रे येथील घरी पोहोचले होते. परंतु आमिर किंवा त्याच्या टीमने अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे एवढे आयपीएस अधिकारी आमिर खानच्या घरी एकत्र का पोहोचले, हे अद्यापही समजू शकलेलं नाही. Aamir Khan |
View this post on Instagram
मात्र या व्हिडीओवरआमिर खानचे चाहते विविध प्रकारचे अंदाज बांधत आहेत. कमेंट करत एका युजरनं विचारलं, ‘रेड पडली आहे का?’, दुसऱ्याने म्हटलं, ‘हे सर्व स्टार जमीन पाहण्यासाठी आले आहेत’, तिसऱ्याने लिहिलं, ‘काय झालं?
त्यामुळे चाहते देखील संभ्रमात पडले आहेत.
आमिरच्या ‘सितारे जमीन पर‘ चित्रपटाने एका महिन्यातच भारतात सुमारे १६५ कोटी रुपये कमावले. आर.एस. प्रसन्ना यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते आणि त्यात जिनिलिया डिसूझाही पाहायला मिळाली. Aamir Khan |
तिसऱ्यांदा प्रेमात पडल्याचं जाहीर केलं
याशिवाय वयाच्या साठीला आलेला आमिर त्याची प्रेयसी गौरी स्प्राटसोबत अनेक वेळा स्पॉट झाला. काही दिवसांपूर्वी त्याने दोन घटस्फोटानंतर आपण तिसऱ्यांदा प्रेमात पडल्याचं जाहीर केलं. त्यानंतर माध्यमांना त्याच्या गर्लफ्रेंडची भेट घडवून दिली होती. ज्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आले होते. Aamir Khan |
हेही वाचा :
Ladki Bahin yojana : लाडकी बहीण योजनेत तब्बल 26 लाख महिला अपात्र, आदिती तटकरेंनी दिली माहिती





