आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा; 5 दिवसांत कोटींची कमाई

Sitaare Zameen Par | बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पहिल्याच आठवड्यात या सिनेमानं चांगली कमाई केली आहे. आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता. त्यानंतर मिस्टर परफेक्शनिस्टने स्वतःला तीन वर्षे चित्रपटांपासून दूर ठेवले होते. पण आता ‘सितारे जमीन पर’ सोबत सुपरस्टारने जबरदस्त पुनरागमन केले आहे. सध्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे.
आमिर खान स्टारर चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 10.7 कोटींनी खाते उघडले होते. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 20.2 कोटी कमावले आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 27.25 कोटी रुपये होते. तर चौथ्या दिवशी ‘सितारे जमीन पर’ ची कमाई 8.5 कोटी रुपये होती. हा सिनेमा ‘भूल चुक माफ’च्या 74.72 कोटींच्या कलेक्शनला मागे टाकत 2025 मधील 8 वा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. Sitaare Zameen Par |
आता सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘सितारे जमीन पर’ ने रिलीजच्या 5व्या दिवशी 8.50 कोटींचा कलेक्शन केला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या 5 दिवसांत 75.15 कोटींचे कलेक्शन केले आहे आणि आता तो 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यापासून काही अंतरावर आहे. लवकरच हा चित्रपट दुसऱ्या वीकेंडपर्यंत 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. Sitaare Zameen Par |
हेही वाचा:
Crime News : शिरुर तालुक्यात विहिरीवरील मोटार चोरीला; अज्ञात व्यक्ती विरोधात पोलिसात गुन्हा दाखल





