Net Bowler Injured : दिल्ली कॅपिटल्सच्या सराव सत्रात भीषण अपघात! फलंदाजाचा शॉट थेट तोंडावर लागल्याने गोलंदाज गंभीर जखमी, पाहा VIDEO
Net Bowler Injured : शुक्रवारी सराव सत्रादरम्यान दिल्ली कॅपिटल्सच्या एका नेट बॉलरला गंभीर दुखापत झाल्याने क्रिकेट वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Delhi Capitals Net Bowler Injured Video Viral : दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील महत्त्वाच्या लढतीपूर्वी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर एक भीषण अपघात घडला आहे. शुक्रवारी सराव सत्रादरम्यान दिल्ली कॅपिटल्सच्या एका नेट बॉलरला गंभीर दुखापत झाल्याने क्रिकेट वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं घडलं काय?
आयपीएल २०२६ मधील दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यापूर्वी दिल्लीच्या संघांची चिंता वाढली आहे. सरावाच्या वेळी एका फलंदाजाने मारलेला वेगवान शॉट थेट समोरून गोलंदाजी करणाऱ्या ‘नेट बॉलर’च्या तोंडावर लागला. चेंडूचा वेग इतका प्रचंड होता की तो लागताच हा खेळाडू रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मैदानात तातडीने रुग्णवाहिका (Ambulance) बोलावण्यात आली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रिकी पॉन्टिंगने दिला धीर –
A young Delhi Capitals player was hit hard on the face by the ball during practice, which caused a serious injury. An ambulance was called to the ground, and he was placed on a stretcher and taken to the hospital.😢
I hope he’s okay and hasn’t suffered any serious injury.🙏 pic.twitter.com/JX8Xjl6YOW
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) April 24, 2026
अपघातानंतर मैदानात एकच खळबळ उडाली. या खेळाडूला जेव्हा उपचारासाठी नेले जात होते, तेव्हा पंजाब किंग्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी स्वतः जाऊन त्याची भेट घेतली आणि त्याला धीर दिला. जखमी खेळाडूची ओळख अद्याप पटलेली नसली तरी, त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले.
दिल्ली विरुद्ध पंजाब: कडवी झुंज –
आयपीएलच्या ३५ व्या सामन्यात गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या पंजाब किंग्सचा सामना दिल्लीशी होणार आहे. पंजाबने ६ पैकी ५ सामने जिंकून ११ गुणांसह पहिले स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, दिल्लीने ६ पैकी ३ सामने जिंकले असून ते सहाव्या क्रमांकावर आहेत. दिल्लीच्या फलंदाजीवर सातत्याने टीका होत आहे, मात्र ट्रिस्टन स्टब्सने यावर बचाव केला आहे. स्टब्सच्या मते, “आम्ही प्रत्येक सामन्यात लक्ष्याचा पाठलाग (Chase) करत आहोत, त्यामुळे आमची कामगिरी खराब दिसत आहे. गेल्या सामन्यात एकाच षटकात ३ विकेट्स जाऊनही आम्ही १९० धावांपर्यंत मजल मारली होती.”
आता सरावातील या अपघाताचा परिणाम दिल्लीच्या कामगिरीवर होतो की संघ सावरून विजयाची नोंद करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.





