Vivo चा धमाका! 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी, 24GB रॅमसह येणारा शानदार फोन लाँच, पाहा किंमत

Vivo V50 Smartphone: Vivo ने भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने मिड-रेंजमध्ये येणारा Vivo V50 हा स्मार्टफोन भारतात लाँच केला असून, यामध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 चिपसेट, 24 GB पर्यंत रॅम, Ultra Large VC Smart Cooling System, फास्ट चार्जिंग या सारखे शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. दमदार फीचर्ससह येणाऱ्या व्हिवोच्या या स्मार्टफोनविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Vivo V50 ची किंमत
Vivo V50 स्मार्टफोनला कंपनीने वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 34,999 रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटला खरेदी करण्यासाठी 36,999 रुपये खर्च करावे लागतील.
त्याचबरोबर, 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंट 40,999 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या फोनचे प्री-बुकिंग सुरू झाले आहे. ग्राहकांना ठराविक बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा मिळेल. याशिवाय, डिव्हाइसला नो-कॉस्ट EMI ऑफरवरही खरेदी करता येईल.
Vivo V50 चे फीचर्स
Vivo V50 स्मार्टफोनमध्ये 6.77-इंच क्वाड-कर्व्ड एमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन 2392×1080 पिक्सल आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 450 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट मिळतो. स्क्रिनच्या सुरेक्षसाठी Diamond Shield Glass देण्यात आले आहे. फोनमध्ये केवळ 0.186cm पातळ बेझल्स दिले आहेत.
विवोने या फोनला Qualcomm Snapdragon 7 Gen 3 चिपसेटसह सादर केले आहे. यामध्ये तुम्हाला 12 जीबीपर्यंत इनबिल्ट रॅम मिळते. याशिवाय, 12 जीबीपर्यंत व्हर्च्युअल रॅमचाही सपोर्ट मिळेल. अशाप्रकारे, तुम्हाला फोनला 24 जीबी रॅमसह वापरू शकता.
फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेऱ्यासह 50MP प्रायमरी रियर कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी फ्रंटला 50 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. यात 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की हा 6000mAh बॅटरीसह येणारा सर्वात स्लिम फोन आहे. हँडसेटमध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.
Vivo V50 स्मार्टफोन Android 15 आधारित FunTouch OS 15 वर काम करतो. फोनला पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी IP68 आणि IP69 रेटिंग मिळाले आहे. याशिवाय, यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि ब्लूटूथ 5.4 देखील दिले आहेत.





