Vivo Money Laundering Case: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चिनी स्मार्टफोन निर्माता विवो आणि काही इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या चौकशीत आणखी तीन जणांना अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिघांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदीनुसार ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र यांची नावे अद्याप अधिकाऱ्यांनी उघडकीस आणली नाहीत.
फेडरल एजन्सीने या प्रकरणी यापूर्वी चार जणांना अटक केली होती. त्यामध्ये मोबाइल कंपनी लावा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक हरी ओम राय, चीनी नागरिक गुआंगवेन उर्फ अँड्र्यू कुआंग, चार्टर्ड अकाउंटंट नितीन गर्ग आणि राजन मलिक यांचा समावेश आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने नुकतेच या लोकांविरुद्ध दिल्लीतील विशेष पीएमएलए न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केले होते आणि न्यायालयाने त्याची दखल घेतली.