FIDE rankings : डी. गुकेशने टाकले आनंदला मागे
Updated On:

बंगळुरु :- भारताचा नवोदित ग्रॅंडमास्टर डी गुकेश याने बुद्धिबळ विश्वकरंडक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत अजरबैजानच्या मिसरातदिन इस्कांद्रोवचा पराभव केला. या कामगिरीच्या जोरावर गुकेशने जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या (फिडे) क्रमवारीत भारताचाच वरिष्ठ ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंद यालाही मागे टाकले आहे.
आता तो या क्रमवारीत 9 व्या स्थानावर पोहचला आहे. विश्वनाथन आनंद 10 व्या स्थानावर आहे. डी गुकेश येत्या 1 सप्टेंबरला जाहीर होणाऱ्या नव्या क्रमवारीला अद्याप एक महिना बाकी असला तरीही तो आपले स्थान कायम राखेल असेच चित्र सध्या दिसत आहे.
यापूर्वी 2016 साली पेंडल्या हरिकृष्णन यानेही आनंदला मागे टाकले होते. मात्र त्याला आपले क्रमवारीतील स्थान टिकवता आले नाही.





