Vishwajit More Silver : मराठमोळ्या कुस्तीपटूने अमेरिकेत रचला इतिहास! विश्वजित मोरे ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय
Vishwajit More Silver : कोल्हापूरच्या विश्वजीतविरुद्ध शेवटच्या काही सेकंदांमध्ये कारुमिद्झेने अत्यंत वेगवान हालचाली करत निर्णायक गुण मिळवले आणि सामना १२-१३ असा आपल्या बाजूने झुकवला.

Vishwajit Ramchandra More Wins Historic Silver at U23 World Wrestling Championship : भारताचा युवा कुस्तीपटू विश्वजित रामचंद्र मोरे याने गुरुवारी अंडर-२३ जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक पराक्रम केला आहे. पुरुषांच्या ५५ किलो ग्रीको-रोमन वजनी गटाच्या अंतिम फेरीत विश्वजितला जॉर्जियाच्या कोबा कारुमिद्झेविरुद्ध १२-१३ अशा निसटत्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. अवघ्या एका गुणाने सुवर्णपदक हुकले असले, तरी या स्पर्धेच्या ग्रीको-रोमन प्रकारात रौप्यपदक जिंकणारा विश्वजित पहिला भारतीय मल्ल ठरला आहे.
अखेरच्या क्षणांपर्यंत चुरस; जॉर्जियाच्या मल्लाने मारली बाजी
अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकण्याच्या अगदी उंबरठ्यावर विश्वजित पोहोचला होता. संपूर्ण सामन्यात त्याने आक्रमक डावपेच रचत आघाडी घेतली होती. मात्र, शेवटच्या काही सेकंदांमध्ये कारुमिद्झेने अत्यंत वेगवान हालचाली करत निर्णायक गुण मिळवले आणि सामना १२-१३ असा आपल्या बाजूने झुकवला. अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय ग्रीको-रोमन कुस्तीपटू ठरत विश्वजितने आधीच इतिहास रचला होता.
विद्यमान जागतिक विजेत्याला लोळवले; उपांत्य फेरीत रशियन मल्लावर मात –
HUGE UPSET BY VISHVAJIT MORE! 🤯🔥
India’s Vishvajit More stuns U20 World Champion Shamsipour 🇮🇷 with a dominant 8-1 victory to storm into SF of Men’s Greco-Roman 55kg at U23 World Champions 2026 https://t.co/d6TQ8CwzuE
— The Khel India (@TheKhelIndia) October 14, 2026
विश्वजितने पहिल्या फेरीत मेक्सिकोच्या आयझॅक मारिनचा १०-८ असा पराभव केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत अंडर २० चा विद्यमान जागतिक विजेता इराणच्या आर्मिन शम्सीपूरला ८-१ ने लोळवत सर्वांचे लक्ष वेधले. या सामन्यात त्याने अप्रतिम चार गुणांचा थ्रो मारला. उपांत्य फेरीत रशियाच्या मलिक गिगिएव्हचा ७-४ असा पाडाव करत त्याने थेट अंतिम फेरीत धडक मारली होती.
यापूर्वी दोन कांस्य; आता ऐतिहासिक रौप्यपदक –
#Proud
#IndianArmy congratulates Sports Cadet Vishwajit More for clinching #SilverMedal 🥈 in the Under-23 Asian #Wrestling Championship held at Amman City in #Jordan and bringing laurels to the Nation.
#IndianArmy
#MissionOlympics https://t.co/SDD2YfSADs— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) July 18, 2024
विश्वजितने यापूर्वी याच स्पर्धेत भारताला दोन वेळा कांस्यपदक मिळवून दिले होते. यंदा कामगिरीत आणखी सुधारणा करत त्याने ऐतिहासिक रौप्यपदक आपल्या नावावर केले. सुवर्णपदक निसटले तरी ग्रीको-रोमनसारख्या अत्यंत आव्हानात्मक प्रकारात भारताचा दबदबा निर्माण करण्यात तो यशस्वी ठरला आहे.
कोमल आणि दीक्षा कांस्यपदकाच्या शर्यतीत कायम –
🇮🇳 𝐇𝐢𝐬𝐭𝐨𝐫𝐢𝐜 𝐀𝐜𝐡𝐢𝐞𝐯𝐞𝐦𝐞𝐧𝐭 𝐟𝐨𝐫 𝐈𝐧𝐝𝐢𝐚𝐧 𝐖𝐫𝐞𝐬𝐭𝐥𝐢𝐧𝐠!
Vishvajit Ramchandra More wins a historic silver medal in the Greco-Roman 55kg category at the U23 World Championships in Las Vegas.
More narrowly loses 12–13 to Georgia’s Koba Karumidze in the final seconds of the bout, becoming the first Indian wrestler to reach a Greco-Roman final and win silver at the U23 World Championships.
#IndianWrestling #U23WorldChampionships #VishvajitMore #Wrestling
— All India Radio News (@airnewsalerts) October 15, 2026
महिला गटात कोमलला उपांत्य फेरीत युक्रेनच्या अलिना फिलिपोविचकडून तांत्रिक श्रेष्ठतेच्या आधारे पराभव पत्करावा लागल्याने तिचे आव्हान कांस्यपदकासाठी कायम आहे. ६८ किलो वजनी गटात दीक्षा मलिकही कांस्यपदकाच्या लढतीत उतरणार आहे. मानसी लाठरला इटलीच्या लॉरा गोडिनोकडून ९-१० असा निसटता पराभव झाल्याने बाहेर पडावे लागले. पुरुषांच्या ग्रीको-रोमनमध्ये चेतन आणि करण कंबोज यांचे आव्हान आधीच संपुष्टात आले.





