विशाल निकमने दिली प्रेमाची कबुली; कोण आहे अभिनेत्याची ‘सौंदर्या’?

Vishal Nikam | नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक मराठी कलाविश्वातील कलाकार मंडळींनी आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. यातच आता ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सीझनचा विजेता, अभिनेता विशाल निकमने रोमँटिक फोटो शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली.
विशाल निकमने बिग बॉसच्या घरात असताना त्याच्या आयुष्यात ‘सौंदर्या’ असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता त्याने त्याच्या सौंदर्याची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
इंस्टाग्रामवर विशालने दोघांचे रोमँटिक फोटोशूट केलं आहे. यापैकी कुठल्याच फोटोमध्ये तिचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. पण ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अक्षया हिंदळकर असल्याचं सांगितले जात आहे.
View this post on Instagram
विशालने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सौंदर्याचा चेहरा दिसत नसला तरीही नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये अक्षयाचं नाव घेत तिला टॅग देखील केलं आहे. या पोस्टवर स्वत: अक्षयाने कमेंट करत विशालचं अभिनंदन केलं आहे.
विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांनी स्टार प्रवाहच्या ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली असल्याचे म्हंटले जात आहे. Vishal Nikam |
विशालच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर सध्या तो ‘स्टार प्रवाह’च्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत राया ही प्रमुख भूमिका साकारत आहे. त्याच्यासह या सिरियलमध्ये अभिनेत्री पूजा बिरारी मुख्य भूमिकेत झळकत आहे. तर अक्षया ‘पीएसआय अर्जुन’मध्येही झळकली होती. ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेत तिने श्रुतीची भूमिका साकारली होती. Vishal Nikam |
हेही वाचा:
इस्रोचे PSLV C62 मिशन ‘फेल’ ! ‘अन्वेषा’ उपग्रह कक्षेत तैनात करण्यात अयशस्वी, रॉकेटने बदलली दिशा





