टी-20 मालिकेसाठी विराट कोहली गाळतोय घाम; सराव करतानाचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई – भारत आणि इंग्लंड संघात नुकतीच चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत भारतीय संघाने 3-1 अशा फरकाने पाहुण्या संघाचा पराभव केला. त्याचबरोबर चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत मोठ्या दिमाखात प्रवेश केला.
यानंतर आता या दोन संघात टी-20 आणि वनडे मालिका खेळली जाणार आहे. त्यापैकी पहिल्यांदा 5 सामन्याची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी विराट कोहली कसून सराव करत आहे. त्याचा व्हिडिओ सोशल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (12 मार्च) खेळला जाणार आहे.
View this post on Instagram
इंग्लंड विरुद्ध होणार्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा अगोदरच झालेली आहे. त्यामुळे निवड झालेले खेळाडूं सध्या सराव सत्रात व्यस्त आहेत. ‘रनमशीन ‘ या नावाने ओळखला जाणार भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा कसोटी मालिकेत त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे.
त्यामुळे विराट कोहली आता टी-20 मालिकेत ही उणीव भरून काढण्यासाठी नेटमध्ये खूप घाम गाळत आहे. त्याने नेटमध्ये सराव करत असतानाचा एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये तो फलंदाजीचा सराव करताना दिसून येत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओ खाली कॅप्शन देताना त्यानी लिहले आहे की, “नवीन आठवडा, नवीन स्वरूप, समान अभियान. चला ते घेऊया”
भारताचा टी-20 मालिकेचा संघ :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वाॅशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.





