IND vs AUS : किंग कोहलीने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास! इयान बॉथमचा मोडला सर्वात मोठा विक्रम

विराट दोन झेल घेत मोडला बॉथमचा विक्रम –
विराट कोहलीने या सामन्यात दोन महत्त्वपूर्ण झेल घेतले. त्याने वॉशिंगटन सुंदरच्या गोलंदाजीवर मॅथ्यू शॉर्टचा अफलातून झेल टिपला. शॉर्टने जोरदार पुल शॉट खेळला, परंतु कोहलीने अचूक अंदाज आणि चपळाईने हा झेल पूर्ण केला. यानंतर त्याने हर्षित राणाच्या गोलंदाजीवर कूपर कॉनोलीचाही झेल घेतला.
या दोन झेलांसह कोहलीने ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा परदेशी क्षेत्ररक्षक बनण्याचा इंग्लंडच्या इयान बॉथमचा विक्रम मोडला. कोहलीच्या नावावर आता ऑस्ट्रेलियात 38 झेल असून, बॉथमने 37, तर वेस्टइंडीजच्या कार्ल हूपरने 33 झेल घेतले होते.
हेही वाचा – IND vs AUS : रोहित शर्माचं अनोखं शतक! वनडेत अशी कामगीरी करणारा ठरला सहावा भारतीय
हर्षित राणाची कमाल, ऑस्ट्रेलिया 236 धावांत गारद –
ऑस्ट्रेलियाकडून मॅट रेनशॉने सर्वाधिक 56 धावा केल्या, तर मिचेल मार्शने 41 आणि मॅथ्यू शॉर्टने 30 धावांचे योगदान दिले. मात्र, अन्य फलंदाज अपयशी ठरले, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 236 धावांत आटोपला. भारतीय गोलंदाजांपैकी हर्षित राणाने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या, तर वॉशिंगटन सुंदरने दोन गडी बाद केले. भारतीय गोलंदाजांनी सामन्याच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. सध्या भारताने 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू केला असून, सामन्याचा निकाल उत्सुकतेचा विषय ठरला आहे.





