IND vs AUS : झाम्पा-शॉर्टच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय, भारताने गमावली मालिका

IND vs AUS Australia beat India by 2 Wickets : ऑस्ट्रेलियाने अॅडलेड वनडे सामन्यात भारताचा 2 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेत मालिका खिशात घातली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने रोहित-अय्यरच्या अर्धशतकांच्या जोरावर 9 बाद 264 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने शॉर्ट आणि कोनोलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 46.2 षटकांत 8 गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला.
विराट आणि गिल पुन्हा अपयशी –
या सामन्यात भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या 17 धावांवर भारताने आपले दोन मोठे फलंदाज गमावले. कर्णधार शुभमन गिल 9 धावांवर बाद झाला, तर विराट कोहली याला पहिल्या वनडेनंतर या सामन्यातही शून्यावर विकेट गमवावी लागली. यामुळे चाहते आणि संघ व्यवस्थापनाच्या अपेक्षा धुळीला मिळाल्या. रोहित शर्मा (57) आणि श्रेयस अय्यर (61) यांनी अर्धशतके झळकावली, पण संघाला 300 धावांचा टप्पा गाठता आला नाही. अक्षर पटेलने 41 चेंडूंमध्ये 44 धावा आणि हर्षित राणाने 24 धावांची खेळी करत संघाला 264 धावांपर्यंत मजल मारता आली.
अॅडम झाम्पाची भेदक गोलंदाजी –
The power of the leg-spinner was the main reason why we didn’t cross 300+.#indvsaus #Adamzampa #Cricket pic.twitter.com/egTcGv8Zkq
— StumpedbyMemes (@StumpedByMemes) October 23, 2025
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झाम्पा या सामन्याचा खरा हिरो ठरला. त्याने 10 षटकांत 6 च्या इकोनॉमीसह 4 विकेट्स घेतल्या. श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल आणि नीतीश कुमार रेड्डी यांना त्याने बाद केले. जेव्हियर बार्टलेटने 3, तर मिचेल स्टार्कने 2 विकेट्स घेत त्याला उत्तम साथ दिली.
हेही वाचा – IND W vs NZ W : प्रतिका रावलने केली विश्वविक्रमाची बरोबरी, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
मॅथ्यू शॉर्टची निर्णायक अर्धशतक –
Half century for Mathew Short. 🔥
– Reaching his fifty from just 23 balls with 6 fours and 4 fours. Well played, Mathew Short Remarkable, Brilliant innings and It was his maiden fifty in ODIs. 👏#ENGvsAUS #MathewShort #ENGvAUS #ICC #CricketTwitter pic.twitter.com/EMWDNqPhQo
— Akaran.A (@Akaran_1) September 29, 2024
ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅथ्यू शॉर्टने संकटमोचकाची भूमिका निभावली. त्याने 78 चेंडूंमध्ये 74 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या पराभवामुळे भारतीय संघावर आता तिसऱ्या सामन्यात सन्मानासाठी लढण्याची वेळ आली आहे. कूपर कॉनोलीने नाबाद 61 धावा केल्या. मिशेल ओवेनने 36 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने 28 आणि मॅट रेनशॉने 30 धावा केल्या. हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.





