Virat Kohli Video : भुवनेश्वरच्या ‘त्या’ यॉर्करसमोर किंग कोहलीची बत्ती गुल!आरसीबीच्या सराव सत्रातील थराराच VIDEO व्हायरल
Virat Kohli Video : चिन्नास्वामी स्टेडियमवर विराट कोहली भुवनेश्वर कुमारसह सराव करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Virat Kohli Video Viral with Bhuvneshwar Kumar IPL 2026 Nets : आयपीएल १९व्या हंगामाचा रणसंग्राम २८ मार्चपासून सुरू होत असून, गतविजेत्या आरसीबी संघाने आपल्या सरावाला जोमाने सुरुवात केली आहे. लंडनहून परतलेला किंग विराट कोहली संघात सामील झाला असून, चिन्नास्वामी स्टेडियमवर भुवनेश्वर कुमारसह सराव करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२६ च्या सलामीच्या सामन्याला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली प्रदीर्घ कालावधीनंतर मैदानात परतला आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचे सराव शिबीर सुरू असून, नेट्समध्ये फलंदाजी करताना विराट कोहलीला स्विंग किंग भुवनेश्वर कुमारने चकित केल्याचे पाहायला मिळाले. Virat Kohli Video
भुवीच्या यॉर्कने विराट चक्रावला – Virat Kohli Video
This yorker from Bhuvneshwar Kumar completely beat Virat Kohli.🫡
In the last two years, Bhuvneshwar Kumar’s name has gone a bit down, but maybe in this IPL he will definitely do something special.🙌 pic.twitter.com/L0bF9BsR0Z
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) March 19, 2026
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, भुवनेश्वर कुमारने टाकलेला एक अचूक यॉर्कर चेंडू विराटला समजलाच नाही. चेंडू इतका वेगात आणि अचूक होता की विराटचा शॉट मारतानाचा ताळमेळ पूर्णपणे चुकला आणि त्याचा तोलही बिघडला. विराटची बॅट हवेतच राहिली आणि चेंडू वेगाने निघून गेला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट आता केवळ आयपीएलमध्येच या फॉरमॅटमध्ये दिसणार असल्याने, त्याच्या फॉर्मकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
९००० धावांचा टप्पा गाठण्याची सुवर्णसंधी – Virat Kohli Video
आयपीएलच्या इतिहासात विराट कोहली हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने २६७ सामन्यांत ८,६६१ धावा केल्या आहेत. यंदाच्या १९ व्या हंगामात विराटला एक मोठा इतिहास रचण्याची संधी आहे. जर त्याने यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी केली, तर आयपीएलच्या इतिहासात ९,००० धावांचा टप्पा ओलांडणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरेल.
आरसीबी आपला पहिला सामना २८ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आपल्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. विराट कोहली आणि भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.





