Dwayne Bravo Controversy : ‘माझ्या घरी दोन गर्लफ्रेंड…’, पत्रकार परिषेदत ब्रावोची जीभ घसरली अन् अंजिक्यने माईक सुरुय म्हणत सावरलं
Dwayne Bravo Controversy : अनवधानाने माईक सुरू असताना ब्राव्होने आपल्या सहकाऱ्यांशी खासगी चर्चा करताना अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Dwayne Bravo Controversy video viral : आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा मेंटॉर ड्वेन ब्राव्हो एका वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडला आहे. केकेआरच्या पत्रकार परिषदेत ब्रावोने महिलांबाबत केलेल्या टिप्पणीनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, कर्णधार अजिंक्य रहाणेने त्याला वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. Dwayne Bravo Controversy
आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर, सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्यासोबत ड्वेन ब्राव्हो व्यासपीठावर उपस्थित होता. यावेळी अनवधानाने माईक सुरू असताना ब्राव्होने आपल्या सहकाऱ्यांशी खासगी चर्चा करताना अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
ब्राव्होचं ‘ते’ वादग्रस्त विधान Dwayne Bravo Controversy
🚨SHAMEFUL REMARK DJ BRAVO 🚨
KKR full management was attending a press conference including their coach and captain. Bravo didn’t know Mics were on when he said I had 2 chicks (girlfriends) at my house. When Rahane told him mic was on his face was completely off. Such a shame… pic.twitter.com/hDi7fQ2zGV
— JB (@93Yorker) March 20, 2026
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ब्राव्हो आपल्या सहकाऱ्यांना सांगताना दिसत आहे की, “जेव्हा या लोकांनी मला बोलावले, तेव्हा माझ्या घरी दोन ‘चिक्स’ (गर्लफ्रेंड) होत्या.” ब्रावोचं हे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच शेजारी बसलेल्या अजिंक्य रहाणेच्या लक्षात आले की माईक सुरू आहे. रहाणेने तात्काळ ब्रावोला सावध केले. माईक सुरू असल्याचे समजताच ब्रावोच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले आणि त्याने ‘ओ शिट’ म्हणत आपली चूक कबूल केली.
सोशल मीडियावर टीकेची झोड –
Bravo : ” I had 2 chicks in my house”
Rahane : “Mics are on,be careful not to talk like this”What kind of filthy words are these from a Mentor of a team 🤡 pic.twitter.com/3mnBuAUcfT
— adi. (@Hurricanrana_27) March 20, 2026
ब्राव्होने वापरलेला ‘चिक्स’ हा शब्द महिलांचा अपमान करणारा असल्याचे मानले जात आहे. जरी तो आपल्या मैत्रिणींबद्दल बोलत असला, तरी सार्वजनिक व्यासपीठावर अशा प्रकारचे शब्द वापरणे गैरजबाबदारपणाचे असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. यापूर्वी हार्दिक पंड्यानेही ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये अशाच प्रकारच्या विधानामुळे माफी मागितली होती. आता ब्राव्होच्या या प्रकरणावर केकेआर व्यवस्थापन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केकेआरचा पहिला सामना जवळ आलेला असताना अशा वादांमुळे संघाच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Dwayne Bravo Controversy





