RCB vs RR : विराट कोहलीने रचला इतिहास! चिन्नास्वामी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Virat Kohli completes 3500 runs at Chinnaswamy Stadium in RCB vs RR match : आयपीएलच्या १८ व्या हंगामात रोमांचक सामन्यांचा प्रवास सुरूच आहे. या हंगामातील ४२ व्या सामन्यात आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने कोहली-पडिक्कलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थान समोर २०६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान विराट कोहलीने एक खास पराक्रम केला आहे.
विराट कोहलीने रचला इतिहास –
चिन्नास्वामी स्टेडियमवर विराट कोहलीने एक मोठा विक्रम केला आहे. विराटने चिन्नास्वामीच्या स्टेडियमवर विराटने ३५०० धावा पूर्ण केल्या आहेत. २००८ पासून आरसीबीकडून खेळत असलेला विराट कोहली टी-२० मध्ये एकाच मैदानावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने १०५ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. विराटने राजस्थान विरुद्धच्या चौथ्या षटकात हा विक्रम केला. यावेळी तो १६ धावांवर खेळत होता.
🚨 𝑴𝑰𝑳𝑬𝑺𝑻𝑶𝑵𝑬 🚨
Virat Kohli completes 3,500 T20 runs at the M. Chinnaswamy Stadium — one of his favourite venues 🏟️🇮🇳🔥#IPL2025 #RCBvRR #ViratKohli #Sportskeeda pic.twitter.com/2kKRzHaW9P
— Sportskeeda (@Sportskeeda) April 24, 2025
यंदाच्या हंगामात विराटचे चिन्नास्वामीवर पहिले अर्धशतक –
आयपीएल २०२५ मध्ये विराट कोहलीची बॅट जोरदार तळपत आहे. मात्र, चिन्नास्वामीच्या मैदानावर तो पहिल्यांदाच फॉर्ममध्ये दिसला आणि त्याने अर्धशतक झळकावले. कोहलीने ९ डावांमध्ये ३५० हून अधिक धावा केल्या आहेत, ज्यात ५ अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान, मुल्लानपूर येथे त्याची नाबाद ७३ धावांची खेळी ही पंजाब किंग्जविरुद्धची त्याची सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. कोहलीचे पहिले ४ अर्धशतके घराबाहेर होते, पण आज त्याने घरच्या मैदानावर यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले.
हेही वाचा – Ishan Kishan : ‘थांब भाऊ, त्या कामासाठी पंचांना पैसे मिळतात…’, इशानच्या निर्णयावर संतापला माजी खेळाडू
सामन्याबद्दल बोलायचे, तर कोहली आणि पडिक्कल यांच्या अर्धशतकी खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्ससमोर २०६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, आरसीबीने २० षटकांत पाच गडी गमावून २०५ धावा केल्या. या संघाविरुद्ध आरसीबीची हा सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यांच्यासाठी किंग कोहलीने सर्वाधिक ७० धावांची खेळी खेळली. राजस्थानकडून संदीप शर्माने दोन तर जोफ्रा आर्चर आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.





