DC vs RCB : राजधानीत भुवी-हेझलवूड समोर दिल्ली कॅपिटल्सची सपशेल शरणागती! आरसीबीने ९ विकेट्सनी एकतर्फी मारली बाजी
DC vs RCB : अरुण जेटली स्टेडियमवरील सोमवारची रात्र दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांसाठी एक भयावह स्वप्न ठरली.

DC vs RCB Royal Challengers Bengaluru Big Win : आयपीएल २०२६ च्या ३९ व्या सामन्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) यजमान दिल्ली कॅपिटल्सचा अक्षरशः पालापाचोळा केला आहे. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. यानंतर प्रत्युत्तरात आरसीबीने हा सामना ९ गडी राखून अत्यंत एकतर्फी जिंकला.
अरुण जेटली स्टेडियमवरील सोमवारची रात्र दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांसाठी एक भयावह स्वप्न ठरली. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय सार्थ ठरवत भुवनेश्वर आणि हेझलवूडने दिल्लीची अवस्था ७ धावांत ५ बाद अशी केली होती. दिल्लीचा संपूर्ण संघ अवघ्या १६.३ षटकांत ७५ धावांवर गारद झाला.
Innings Break! #RCB bundle out #DC for the lowest total of the season 🫣
The chase on the other side #TATAIPL | #KhelBindaas | #DCvRCB pic.twitter.com/Yh1SU7eepi
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2026
भुवनेश्वर आणि हेझलवूडचे सुरुवातीचे तडाखे –
A Dream Start! 🤩
Bhuvneshwar Kumar and Josh Hazlewood swing #DC’s fortunes into doldrums 👊
Relive their spell ▶️ https://t.co/CgtgazSP4O#TATAIPL | #KhelBindaas | #DCvRCB pic.twitter.com/dXL5WhU3e2
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2026
बंगळुरूच्या गोलंदाजांनी सामन्याच्या पहिल्या चेंडूपासूनच वर्चस्व गाजवले. अनुभवी भुवनेश्वर कुमारने आपल्या पहिल्याच षटकात पदार्पण करणाऱ्या साहिल परखला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर जोश हेझलवूडने दुसऱ्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर केएल राहुल आणि समीर रिझवीला बाद करत दिल्लीला मोठा धक्का दिला. तिसऱ्या षटकात भुवनेश्वरने पुन्हा एकदा ट्रिस्टन स्टब्स आणि कर्णधार अक्षर पटेलला माघारी धाडले. अवघ्या ४ षटकांनंतर दिल्लीचा स्कोर ९ बाद ६ होता, जो आयपीएल इतिहासातील सर्वात खराब सुरुवातींपैकी एक आहे.
हेही वाचा – Mitchell Santner Injury : मुंबई इंडियन्सला मोठा झटका! स्टार अष्टपैलू खेळाडू IPL मधून बाहेर; ‘या’ फिरकीपटूची संघात अचानक एन्ट्री
आरसीबीचा विक्रमी पाठलाग –
Why take it deep when you can just finish it in 6.3 overs? ⏩💥
🎥 Back-to-back maximums from Virat Kohli to put the perfect finishing touch on a clinical performance! 🤌
Scorecard ▶️ https://t.co/HIiNNEutP0#TATAIPL | #KhelBindaas | #DCvRCB | @RCBTweets pic.twitter.com/4b2yUCDqLZ
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2026
दिल्लीच्या बाजूने अभिषेक पोरेल (३०) आणि डेव्हिड मिलर (१९) यांनी थोडा संघर्ष केला, मात्र इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भुवनेश्वरने ३ तर हेझलवूडने ४ बळी टिपले. विजयासाठी मिळालेल्या ७६ धावांचे लक्ष्य आरसीबीने अवघ्या ६.३ षटकांत १ गडी गमावून पूर्ण केले. या विजयामुळे आरसीबीने गुणतालिकेत आपली स्थिती मजबूत केली असून दिल्लीसाठी हा पराभव अत्यंत मानहानीकारक ठरला आहे.





