Virat Kohli Record : ‘किंग’ कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा वर्ल्डरेकॉर्ड! कुमार संगकारालाही टाकलं मागे

Virat Kohli Fastest 28000 International Runs Record : भारतीय क्रिकेटचा स्टार विराट कोहलीने वडोदरा येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळताना क्रिकेट विश्वात एक नवा इतिहास रचला आहे. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या विराटने अवघ्या २५ धावा पूर्ण करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८,००० धावांचा टप्पा ओलांडला. हा टप्पा गाठणारा तो जगातील केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे. मात्र, या प्रवासात त्याने महान सचिन तेंडुलकरचा एक मोठा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे.
सचिनचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त!
विराट कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २८ हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज बनला आहे. त्याने सचिन तेंडुलकरला मोठ्या फरकाने मागे टाकले आहे. विराट कोहलीने हा पराक्रम अवघ्या ६२४ डावांमध्ये केला आहे. त्याच्याआधी सचिन तेंडुलकरचा हा पल्ला ६४४ डावांमध्ये पार केला होता. त्याचबरोबर श्रीलंकेच्या कुमार संगकाराने ही कामगिरी ६६६ डावांमध्ये केली होती. या दोघांनाही आता विराट कोहलीने मागे टाकले आहे.
2⃣8⃣,0⃣0⃣0⃣ international runs..
..And counting!
Congratulations, Virat Kohli 👏👏
Updates ▶️ https://t.co/OcIPHEpvjr#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank | @imVkohli pic.twitter.com/dOHh3l6dvW
— BCCI (@BCCI) January 11, 2026
संगकाराला धोबीपछाड; विराट दुसऱ्या क्रमांकावर विराटमान –
🚨 Milestone Alert 🚨
Virat Kohli is now the second highest run-getter in international cricket (Men’s) 🫡
Updates ▶️ https://t.co/OcIPHEpvjr#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/vf3Yr8FYhG
— BCCI (@BCCI) January 11, 2026
याच सामन्यात विराटने श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकाराचा आणखी एक मोठा विक्रम मोडला. आपल्या खेळीत ४२ धावा पूर्ण करताच विराटने संगकाराच्या २८,०१६ धावांचा विक्रम मागे टाकला. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
हेही वाचा – Rohit Sharma : ‘हिटमॅन’चा वर्ल्डरेकॉर्ड! रोहित गेलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा (तिन्ही फॉरमॅट मिळून):
- सचिन तेंडुलकर (भारत): ३४,३५७ धावा
- विराट कोहली (भारत): २८,०१७* धावा
- कुमार संगकारा (श्रीलंका): २८,०१६ धावा
- रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया): २७,४८३ धावा
हेही वाचा – Virat Kohli Record : ‘किंग’ कोहलीचा सौरव गांगुलीला धोबीपछाड! मैदानात उतरताच रचला इतिहास
वनडे क्रिकेटमधील ‘बादशाहत’ कायम –
कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट आता केवळ एकदिवसीय (ODI) क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. आता न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांतून तो धावांचा हा डोंगर आणखी किती उंच नेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





