Virat Kohli Record : ‘किंग’ कोहलीचा सौरव गांगुलीला धोबीपछाड! मैदानात उतरताच रचला इतिहास

Virat Kohli broke Sourav Ganguly record : भारतीय क्रिकेटचा ‘रन मशीन’ विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात मैदानात पाऊल ठेवताच एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. बॅटने धावांचा पाऊस पाडण्यापूर्वीच विराटने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचा एक खास विक्रम मोडीत काढला असून, तो आता भारतासाठी सर्वाधिक वनडे खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ‘टॉप-५’ मध्ये सामील झाला आहे.
गांगुलीला मागे सारत पाचव्या स्थानी झेप –
न्यूझीलंडविरुद्धचा हा सामना विराट कोहलीच्या कारकिर्दीतील ३०९ वा वनडे सामना आहे. यापूर्वी तो ३०८ सामन्यांसह सौरव गांगुलीच्या बरोबरीने होता. आता सौरव गांगुलीला मागे टाकत तो पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
VIRAT KOHLI’S INTERNATIONAL CRICKET ACHIEVEMENTS 🐐
A LEGEND OF THE GAME #ViratKohli #INDvsNZ #ALPHADRIVEONE pic.twitter.com/X7ok7d9hcp
— Rahul Yadav (@RahulYadav61762) January 11, 2026
भारतासाठी सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या खेळाडूंची यादी:
| खेळाडू | वनडे सामने |
| सचिन तेंडुलकर | ४६३ |
| एम. एस. धोनी | ३४७ |
| राहुल द्रविड | ३४० |
| मोहम्मद अझरुद्दीन | ३३४ |
| विराट कोहली* | ३०९ |
| सौरव गांगुली | ३०८ |
हेही वाचा – MI vs DC : हरमनप्रीतचा ‘रुद्रावतार’ अन् मुंबईचा धमाका! दिल्ली कॅपिटल्सला धूळ चारत नोंदवला पहिला विजय
२०२७ च्या वर्ल्ड कपपर्यंत मोडणार धोनीचा विक्रम?
विराट कोहलीने २०२७ चा वनडे वर्ल्ड कप खेळण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्याची त्याची तंदुरुस्ती पाहता, तो पुढील काही वर्षांत ४० ते ४५ वनडे सामने सहज खेळू शकतो. असे झाल्यास, तो महेंद्रसिंग धोनी (३४७) आणि राहुल द्रविड (३४०) यांना मागे टाकून सचिन तेंडुलकरनंतर भारतासाठी सर्वाधिक वनडे खेळणारा दुसरा खेळाडू बनू शकतो. विराटने यापूर्वीच टी-२० आणि कसोटीतून निवृत्ती घेतल्याने त्याच्यावर कामाचा ताण (Workload) कमी आहे, ज्यामुळे त्याच्या फिटनेसला मदत होणार आहे.
संगकारालाही टाकणार मागे; २८,००० धावांचा टप्पा जवळ –
केवळ सामन्यांची संख्याच नाही, तर धावांच्या बाबतीतही विराट इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. तिन्ही फॉरमॅट मिळून विराटच्या नावावर सध्या २७,९७५ धावा आहेत. केवळ २५ धावा करताच तो २८ हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पूर्ण करणारा जगातील तिसरा फलंदाज ठरेल. तसेच श्रीलंकेच्या कुमार संगकारा (२८,०१६ धावा) याला मागे टाकण्यासाठी विराटला केवळ ४२ धावांची गरज आहे. हे केल्यास तो सचिन तेंडुलकरनंतर जगातील सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनेल.





