Virat Kohli : किंग कोहलीचा सोशल मीडियावरही जलवा! एका इन्स्टा पोस्टमधून करतो कोट्यवधींची कमाई!

Virat Kohli earnings per Insta post : भारतीय क्रिकेट संघाचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहली बर्याच काळापासून मैदानावर दिसला नसला, तरी सोशल मीडियावर त्याचा जलवा कायम आहे. कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, आता तो फक्त एकदिवसीय सामन्यांमध्येच खेळताना दिसणार आहे. तरीही, किंग कोहलीच्या चाहत्यांमधील क्रेझ अजिबात कमी झालेला नाही. यामुळेच विराट कोहली इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमधून कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.
इन्स्टाच्या एका पोस्टमधून कोहलीची कमाई किती?
‘वेल्थ’च्या अहवालानुसार, विराट कोहली एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी 1.4 दशलक्ष अमेरिकी डॉलर आकारतो, म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 12.5 कोटी रुपये. मात्र, प्रत्येक पोस्टसाठी ही रक्कम आकारली जात नाही. कोहली जर एखाद्या ब्रँडसाठी पोस्ट करत असेल, तरच तो ही रक्कम घेतो.
🚨 KING KOHLI – THE BRAND 🚨
– Virat Kohli charge $1.4 Million (12.5 Crores INR) for per post on Instagram. (Wealth). pic.twitter.com/cz4bFbjHtX
— Tanuj (@ImTanujSingh) October 12, 2025
या यादीत प्रथम क्रमांकावर दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे, ज्याला एका पोस्टसाठी 3.2 दशलक्ष अमेरिकी डॉलर मिळतात. दुसऱ्या क्रमांकावर लिओनेल मेसी आहे, ज्याला 2.6 दशलक्ष अमेरिकी डॉलर मिळतात. किंग कोहली या यादीत 14व्या क्रमांकावर आहे. पहिल्या दहामध्ये फक्त हे तीनच खेळाडू आहेत.
हेही वाचा – IND W vs AUS W : स्मृती मंधानाचा ऐतिहासिक पराक्रम; महिला वनडेत ‘ही’ कामगिरी करणारी जगातील पहिलीच खेळाडू
विराट कोहलीचा शेवटचा सामना –
आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यानंतर विराट कोहली मैदानावर दिसला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने शेवटचा सामना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना खेळला होता. आता 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात कोहली खेळताना दिसेल. भारतीय क्रिकेट संघ सध्या 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी करत आहे.
हेही वाचा – IND W vs AUS W : सांगली एक्सप्रेस पुन्हा सुसाट…! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका सामन्यात केले दोन वर्ल्ड रेकॉर्ड
जर कोहलीला त्या स्पर्धेत खेळायचे असेल, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याला फलंदाजीने धडाकेबाज कामगिरी करावी लागेल. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीचा रेकॉर्ड नेहमीच उल्लेखनीय राहिला आहे. विराट कोहलीचा प्रभाव केवळ मैदानापुरता मर्यादित नसून, सोशल मीडियावरही त्याची लोकप्रियता आणि कमाई त्याच्या स्टारडमचे दर्शन घडवते. आगामी मालिकेत त्याच्याकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.





