Virat Kohli Debunk : विराट कोहलीने ‘त्या’ अफवेचा उडवला फज्जा; इन्स्टावर स्टोरी शेअर करत दिले चोख प्रत्युत्तर
Virat Kohli Debunk : किंग कोहलीने या अफवेचा आपल्या खास शैलीत समाचार घेत खंडन केले.

Virat Kohli London Flight Rumor Debunked : आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा स्टार फलंदाज विराट कोहली सोशल मीडियावर चर्चेत आला. मागील काही दिवसांपासून विराटबद्दल सोशल मीडियावर एक विचित्र अफवा पसरली होती. मात्र, किंग कोहलीने या अफवेचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला असून, कोणत्याही शब्दांशिवाय केवळ दोन ‘इमोजी’ वापरून या बातमीतील हवा काढून टाकली आहे
आयपीएलच्या १९व्या हंगामाची तयारी जोरात सुरू असताना विराट कोहलीबद्दल सोशल मीडियावर एक खळबळजनक दावा केला जात होता. ज्यामध्ये विराटने आरसीबी व्यवस्थापनाकडे एक अजब मागणी केल्याची चर्चा रंगली होती. मात्र, विराटने इन्स्टाग्राम स्टोरीवर या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत दोन हसणारे (Laughing Emoji) इमोजी टाकले आहेत. विराटने ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे सांगत तिची खिल्ली उडवली आहे.
नेमकी अफवा काय होती?
The impact of Virat Kohli’s one Instagram story. 😂 pic.twitter.com/vGTTIsk6B8
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 22, 2026
सोशल मीडियावर अशा बातम्या फिरत होत्या की, आयपीएल सामन्यांच्या दरम्यान जेव्हा ३ दिवसांचा गॅप असेल, तेव्हा विराटने भारताबाहेर लंडनला जाण्यासाठी आरसीबीकडे चार्टर्ड फ्लाईटची मागणी केली आहे. या काळात तो लंडनला जाऊन पुन्हा भारतात परतेल, असा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. विराटने या अफवेचा खंडन करत चाहत्यांना स्पष्ट संकेत दिले आहेत की, त्याचे पूर्ण लक्ष सध्या आयपीएलवर आहे.
आयपीएल २०२६ साठी जोरदार सराव –
विराट कोहली सध्या आरसीबीच्या सराव शिबिरात घाम गाळत आहे. गेल्या आठवड्यातच तो लंडनहून भारतात परतला आणि थेट संघाच्या कॅम्पमध्ये सामील झाला. सरावादरम्यानचे त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करताना आणि फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.
विराट कोहली हा आयपीएलच्या इतिहासातील एकमेव असा खेळाडू आहे, जो पहिल्या हंगामापासून (२००८) आजपर्यंत एकाच फ्रँचायझीशी (आरसीबी) जोडलेला आहे. यंदाच्या १९ व्या हंगामात विराट आरसीबीला पहिले जेतेपद मिळवून देण्यासाठी सज्ज झाला आहे.





