Virat Kohli Bowled : किंग कोहली अडकला बिश्नोईच्या ‘चक्रव्यूहात’! क्लीन बोल्ड करत विराटचा केला गेम, पाहा VIDEO
Virat Kohli Bowled : रवि बिश्नोईने पुन्हा 'किंग' विराट कोहलीचा गेम केला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Virat Kohli Bowled against RR IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या १६ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील लढतीत एका मोठ्या विकेटने सामन्याचे पारडे फिरवले. आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीला राजस्थानच्या फिरकीपटू रवि बिश्नोईने आपल्या जाळ्यात अडकवत क्लीन बोल्ड केले, ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
बरसापारा क्रिकेट स्टेडियम राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीची सुरुवात खराब झाली. अशा स्थितीत विराट कोहली आक्रमक पवित्र्यात दिसत होता. त्याने अवघ्या १६ चेंडूंत ३२ धावांची वेगवान खेळी करत डावाला गती दिली. मात्र, डावाच्या ५ व्या षटकात राजस्थानचा फिरकीपटू रवि बिश्नोई गोलंदाजीला आला आणि त्याने कोहलीचा खेळ संपवला.
नेमका कसा बाद झाला ‘किंग’ कोहली?
What a spell from Bishnoi! The Purple Cap holder just cleaned up Kohli for 32. Huge wicket for RR, keeping RCB locked down at 61-3 after the first six overs.”#viratkohli #kohli #RRvsRCB #ipl #ravibishnoi pic.twitter.com/oBOgqTs6p6
— Gaurav kumar (@gaurxv_k) April 10, 2026
बिश्नोईने टाकलेल्या एका सरळ आणि चेंडूवर कोहलीने पुढे सरसावत मोठा हवाई शॉट मारण्याचा प्रयत्न केला. चेंडूची गती आणि टप्पा ओळखण्यात कोहली पूर्णपणे चुकला. चेंडू बॅटचा कोणताही स्पर्श न घेता थेट पॅड्सच्या मधून यष्ट्यांवर जाऊन आदळला. क्लीन बोल्ड झाल्याचे पाहून कोहली क्षणभर थक्क झाला आणि निराश होऊन त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
कोहली विरुद्ध बिश्नोई: धक्कादायक आकडेवारी
Virat Kohli Out…🥳🥳#ravivishnoi #ipl2026#viratkohli#rrvsrcb#rcbvsrr pic.twitter.com/PSUdkm5aSy
— Mahi 🇮🇳 (@mkshantav) April 10, 2026
विराट कोहलीचे बाद होणे हा योगायोग नसून रवि बिश्नोईने त्याच्याविरुद्ध रचलेली एक रणनीती आहे. आयपीएल इतिहासात बिश्नोई नेहमीच कोहलीवर भारी पडला आहे. बिश्नोईच्या फिरकीसमोर कोहलीला धावांसाठी संघर्ष करावा लागतो, हे खालील आकडेवारीवरून स्पष्ट होते:
- एकूण डाव: ७
- सामना केलेल्या चेंडू: ४४
- केलेल्या धावा: ३७
- किती वेळा बाद: २
- स्ट्राईक रेट: केवळ ८४.१
टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजांची पिसं काढणाऱ्या कोहलीला बिश्नोईच्या लेगस्पिन आणि गुगलीने पुन्हा एकदा शांत केले आहे.





