IND vs AUS : विराट फक्त धावाच करण्यात नव्हे तर डकमध्ये सर्वात पुढे! आता ‘या’ लज्जास्पद यादीत झाला सामील

Virat Kohli’s Duck Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला पर्थच्या मैदानावर सुरुवात झाली आहे. या सामन्यात सर्वांचे लक्ष दीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीवर केंद्रित होते. यापूर्वी कोहलीला शेवटचे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळताना पाहिले गेले होते. मात्र, या बहुप्रतिक्षित पुनरागमन सामन्यात कोहलीचा बॅट शांत राहिली आणि त्याने चाहत्यांना निराश केले.
पर्थच्या वेगवान आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर कोहली खाते न उघडताच पव्हेलियनमध्ये परतला. मिचेल स्टार्कने आपल्या अचूक गोलंदाजीने या भारतीय दिग्गजाला पुन्हा एकदा त्रस्त केले. कोहलीच्या रुपाने बसलेला हा झटका भारतासाठी सुरुवातीलाच मोठा धक्का ठरला, शिवाय यामुळे तो भारताच्या सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला.
विराट कोहली शून्यावर बाद होणाऱ्या यादीत तिसऱ्या स्थानावर –
Most ducks for India:
43 – Z Khan (227 inns)
40 – I Sharma (173 inns)
39 – V Kohli (618 inns)
37 – Harbhajan Singh (364 inns)
35 – J Bumrah (108 inns)
35 – A Kumble (307 inns)
34 – R Sharma (533 inns)
34 – S Tendulkar (782 inns)pic.twitter.com/JGWIOngI33— CricTracker (@Cricketracker) October 19, 2025
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाल्याने विराट कोहली भारताच्या सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत झहीर खान 43 वेळा शून्यावर बाद होऊन अव्वल स्थानावर आहे, तर ईशांत शर्मा 40 वेळा शून्यावर बाद होऊन दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 618 डावांमध्ये 39 वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरला आहे.
हेही वाचा – IND vs AUS : पहिल्याच सामन्यात विराट कोहलीसोबत हे काय घडलं? ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिल्यांदाच झालं असं
भारताचे सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे खेळाडू:
- झहीर खान – 227 सामने – 43 वेळा
- ईशांत शर्मा – 173 सामने – 40 वेळा
- विराट कोहली – 618 सामने – 39 वेळा
- हरभजन सिंग – 364 सामने – 37 वेळा
- जसप्रीत बुमराह – 108 सामने – 35 वेळा
- अनिल कुंबले – 307 सामने – 35 वेळा
- रोहित शर्मा – 533 सामने – 34 वेळा
- सचिन तेंडुलकर – 782 सामने – 34 वेळा
हेही वाचा – IND vs AUS : पहिल्या सामन्यात फ्लॉप, तरी रोहित शर्माने गाठला ‘हा’ ऐतिहासिक टप्पा
विराट कोहलीचा शून्यावर बाद होण्याचा इतिहास –
विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 16 वेळा खाते न उघडताच बाद झाला आहे, तर कसोटी क्रिकेटमध्ये तो 15 वेळा शून्यावर पव्हेलियनमध्ये परतला आहे. या सामन्यात कोहलीच्या लवकर बाद होण्याने भारताच्या फलंदाजीवर परिणाम झाला असून, आता संघाला सावरण्याचे मोठे आव्हान आहे.





